NEET Exam Data Rajkot Center Esakal
देश

NEET Result 2024: पुन्हा घोळ? गुजरातमधील एकाच सेंटरमधील 70 टक्के विद्यार्थी पात्र; नीट निकालाचे आकडे काय सांगतात?

आशुतोष मसगौंडे

NEET परीक्षेबाबत देशातून नवनव्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सध्या टांगणीला लागला आहे. याला जबाबदार असणाऱ्यांचा शोध सध्या सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतल्याचे दिसत असून, न्यायालयाच्या आदेशानंतर एनटीएने शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केले असून, त्यात अनेक आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत.

कारण, गुजरातच्या राजकोट केंद्रातील तब्बल 70 टक्के विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र ठरले आहेत. यापैकी 12 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. इतर काही केंद्रांवरूनही अशीच आकडेवारी समोर आली आहे. यानंतर पुन्हा एकदा नीट परीक्षेत गैरप्रकार झाले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

एका केंद्रातून ७० टक्के विद्यार्थी पात्र

एनटीएने जाहीर केलेल्या निकालाच्या आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, आर. के. विद्यापीठ, राजकोट, गुजरात केंद्रात एकूण 1968 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी 1387 विद्यार्थ्यांनी पात्रता गुण प्राप्त केले आहेत.

याचा अर्थ असा की या एकाच केंद्रातील जवळपास ७०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील जागांसाठी पात्रता गुण प्राप्त केले आहेत.

हा आकडा संपूर्ण भारतातील सर्व केंद्रांपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे 700 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले राजकोट केंद्र बनले आहे. याशिवाय या केंद्रात देशभरातील १.८ लाख वैद्यकीय जागांसाठी पात्रता गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.

राजकोट (आर. के. विद्यापीठ, राजकोट, गुजरात) केंद्र क्रमांक 22701 च्या विश्लेषित डेटावरून असे दिसून येते की, या केंद्रातील 12 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 700 गुण मिळवले, 115 विद्यार्थ्यांनी 650 गुण मिळवले, 259 विद्यार्थ्यांनी 600 गुण मिळवले, 403 विद्यार्थ्यांनी 600 गुण मिळवले तर 598 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

गुजरातच्या डेटावरून असेही दिसून आले आहे की, अहमदाबादमधील दिल्ली पब्लिक स्कूल सेंटरमध्ये 12 विद्यार्थ्यांनी 700 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एकूणच, गुजरातमध्ये राज्यानुसार १२२ विद्यार्थी आहेत ज्यांनी ७०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, त्यापैकी १९ एकट्या राजकोटचे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच यावर्षी NEET UG परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा राज्य, शहर आणि केंद्रनिहाय डेटा जाहीर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर एनटीएने शनिवारी सर्व 24 लाख विद्यार्थ्यांचा डेटा आपल्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे.

NTA द्वारे जारी केलेल्या डेटाचे विश्लेषण दर्शविते की, भारतातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागांसाठी पात्र उमेदवारांची सर्वाधिक संख्या फक्त गुजरातमधील राजकोट आणि राजस्थानमधील सीकरमध्ये आहे. राजकोटमध्ये वैद्यकीय परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT