NTA Exam Dates 2024-25 eSakal
देश

NTA NEET UG 2024 Re Exam: ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा; NTAनं जाहीर केली तारीख

सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी आदेश दिल्यानंतर एनटीएनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

NTA NEET UG 2024 Re Exam: वैद्यकीय प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेत गुण वाढवून दिलेल्या अर्थात ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. या परीक्षेची तारीख NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी आदेश दिल्यानंतर एनटीएनं हा मोठा निर्णय घेतला आहे. (NEET UG 2024 re test of all 1563 candidates will be held on 23 rd June 2024)

'या' दिवशी होणार फेरपरीक्षा

एनटीएनं यासंदर्भात माहिती देणारं ट्विट केलं आहे. यामध्ये म्हटलं की, एनटीएच्या उच्चस्तरीय समितीनं ज्या 1563 विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेले गुण अर्थात ग्रेस मार्क्स मागे घेण्यात येणार असल्याचा अहवाल दिला होता. यावर सुप्रीम कोर्टानं जे निरिक्षण नोंदवलं आहे. त्याला अनुसरुन या सर्व ग्रेस मार्क्स दिलेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 23 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांशी साधणार संपर्क

यासंदर्भात एनटीए लवकरच एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करणार आहे. तसेच या सर्व 1563 विद्यार्थ्यांशी अधिकृत संवाद साधला गेला आहे, याची नोंद राहावी म्हणून त्यांना ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात येईल, असंही एनटीएन आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

सुप्रीम कोर्टानं सकाळी यासंदर्भात अंतिम निकाल दिला. यामध्ये ग्रेस मार्क्स दिलेल्या 1563 विद्यार्थ्यांना कोर्टानं दोन पर्याय दिले. यामध्ये एकतर या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा द्यावी किंवा त्यांना जे मूळ गुण मिळाले आहेत तेच गुण त्यांनी स्विकारावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT