NEET-UG 2024 maharashtra
देश

NEET-UG Counselling: नीट-यूजी प्रकरणात मोठी अपडेट; पुढील नोटिसी येईपर्यंत काऊन्सलिंग स्थगित

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नीट-यूजी काऊन्सलिंग पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएम आणि बीडीएस अंडरग्रॅज्यूएट मेडिकल कोर्सेची प्रवेश प्रक्रिया त्यामुळे सुरू राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून नीट-यूजी परीक्षेसंदर्भात वातावरण तापलं आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी देखील सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या ८ जुलैच्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे.

नीट-यूजी काऊन्सलिंग आयोजित करणाऱ्या मेडिकल काऊन्सिल कमेटीने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. पण, कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आलाय याबाबत समितीने सांगितलेले नाही. यासंदर्भात एमसीसी लवकर पुढील सूचना जारी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

नीट- यूजी काऊन्सलिंग ६ जुलै रोजी होणार होती. पण, अचानक यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी सुप्रीम कोर्टातील ८ जुलैच्या सुनावणीकडे लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी दोनवेळा नीट-यूजी स्थगित करण्याची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आली होती. पण, कोर्टाने काऊन्सलिंगवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, आम्ही काऊन्सलिंगवर स्थगिती आणू शकत नाही. कारण परीक्षा सुरू आहेत.

५ मे रोजी झालेल्या नीट -यूजी परीक्षेमध्ये अनियमितता आढळून आली होती. एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले होते. तसेच, पैसे घेऊन पेपर फोडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नीट-यूजी काऊन्सलिंग काय आहे?

भारतात मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन काऊन्सलिंगची प्रक्रिया आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG परीक्षा पास केली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एमसीसी दरवर्षी ऑनलाईन नीट यूजी काऊन्सलिंगचे चार राऊंड आयोजित करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ते' वक्तव्य भोवलं! काळे झेंडे दाखवत राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा तीव्र विरोध, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

Latest Marathi News Live Updates : माजी आमदार सिताराम घनदाट घेणार शरद पवारांची भेट

Team India semi-Final scenario: भारतीय संघ पहिलाच सामना हरला, उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला; पाकिस्तानचा संघ पुढे गेला...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी भावांनी मागितली माफी,योजनेसाठी बनावट अर्ज केल्याने सहा जणांची चाैकशी

Sharad Pawar: आयाराम वाढवणार पवारांच टेंशन; या निष्ठावान नेत्याने दिला बंडखोरीचा इशारा

SCROLL FOR NEXT