Dharmendra Pradhan esakal
देश

NEET-UG चा अंतिम निकाल कधी?, धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगितली तारीख!

Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला "सत्यमेव जयते" म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सत्याचा विजय झाला आहे आणि आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.

Sandip Kapde

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी NEET-UG मुद्द्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, सत्याचा विजय झाला आहे आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल दोन दिवसांत घोषित केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने नीट-यूजी परीक्षा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर प्रधान यांनी ही घोषणा केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हे देखील स्पष्ट केले की, दोन दिवसांत नवीन मेरिट लिस्ट येईल. प्रधान यांनी विरोधकांवर आरोप केला की, NEET मुद्द्यावर अराजकता आणि नागरिक अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही त्यांच्या रणनीतीचा भाग आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत-

धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला "सत्यमेव जयते" म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सत्याचा विजय झाला आहे आणि आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. आमच्या प्राथमिकता नेहमीच विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या हितांची हानी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानेही हेच सिद्ध केले आहे, असे देखील त्यांनी नमूद केले.

वंचित विद्यार्थ्यांचा विचार-

धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, आम्ही वंचित वर्गाच्या विद्यार्थ्यांचा देखील विचार करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेची नीति स्वीकारली आहे आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर स्पष्ट केले की, पारदर्शकता आणि शून्य त्रुटी बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

एनटीएचे पुनरावलोकन-

केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी सांगितले की, एनटीएच्या पुनरावलोकनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ती योग्यरित्या काम करत आहे. त्यांनी विविध मॉडेलचे प्रस्ताव दिले आहेत आणि आम्ही त्या सर्वांचे ऐकून घेतले आहे. एनटीएला शून्य त्रुटी आणि शून्य तापर फ्री बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

कठोर कारवाईचे आश्वासन-

धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रक्रियेत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितले की, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व दोषींना शोधण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.

विरोधकांवर टीका-

धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, NEET प्रकरणावर विरोधकांनी केलेले विधान हे त्यांच्या बौद्धिक क्षमतेचे दर्शन देते. राहुल गांधी यांनी देशाची निंदा केली आहे. त्यांनी असे म्हटले की, देशातील निवडणूक प्रक्रियेत सातत्याने पराभूत झाल्यानंतर विरोधकांनी अराजकता निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT