Maggi  Sakal
देश

टू मिनिट्स मॅगी महागली, नेस्लेची घोषणा; 'इतक्या' रुपयांनी होणार वाढ

हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले यांनी त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वाढत्या महागाईत आधीच वैतागलेल्या जनतेला आणखी एक मोठा झटका बसला असून, मॅगी आणि चहाप्रेमींना येथून पुढे अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्ले यांनी त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यानुसार आजपासून (14 मार्च) चहा, कॉफी, दूध आणि नूडल्सच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे एचयूएलने म्हटले आहे.

HUL ने ब्रू कॉफीच्या किमतीत 3-7% आणि ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीत 3-4% ने वाढ केली आहे. इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किमतीदेखील 3% वरून 6.66% पर्यंत वाढल्या आहेत. याशिवाय ताजमहाल चहाची किंमत 3.7% वरून 5.8% पर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रुक बाँडच्या सर्व प्रकारच्या चहाच्या किमतीत 1.5% वरून 14% पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मॅगीच्या दरात 9 ते 16 टक्क्यांनी वाढ

नेस्ले इंडियानेही मॅगीच्या किमती 9 ते 16 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. याशिवाय कंपनीने दूध आणि कॉफी पावडरच्या दरातही वाढ केली आहे. वाढलेल्या किंमतीनंतर मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पॅकसाठी 12 रुपयांऐवजी 14 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, दुसरीकडे 140 ग्रॅम मॅगी मसाला नूडल्ससाठी तुम्हाला 3 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. यापूर्वी 560 ग्रॅम मॅगीच्या पॅकसाठी 96 रुपये मोजावे लागत होते, मात्र आता यासाठी 105 रुपये मोजावे लागणार आहेत.

नेस्लेच्या या वस्तूंच्या किमतीही वाढल्या

नेस्लेने एक लिटर A+ दुधाच्या दरातही वाढ केली आहे. यापूर्वी यासाठी 75 रुपये मोजावे लागत होते, तर आता 78 रुपये मोजावे लागणार आहेत. Nescafe क्लासिक कॉफी पावडरच्या किमती 3-7% वाढल्या आहेत. त्याच वेळी, नेसकॅफेचे 25 ग्रॅमचे पॅक आता 2.5% महाग झाले आहे. यासाठी 78 रुपयांऐवजी आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच 145 रुपयांऐवजी 50 ग्रॅम नेसकॅफे क्लासिकसाठी ग्राहकांना 150 रुपये मोजावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT