New Criminal Laws  sakal
देश

New Criminal Laws : नव्या संहितेनुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद;तीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशभरात सोमवारपासून तीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून भारतीय न्याय संहितेनुसार देशातील पहिल्या गुन्ह्याची नोंद राजधानी दिल्लीत झाल्याची आज दिवसभर चर्चा होती, मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिला गुन्हा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नोंदल्याची माहिती दिली.

भारतीय न्याय संहितेर्तंगत देशातील पहिला गुन्हा ग्वाल्हेर येथे दाखल करण्यात आला. हजिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ते प्रकरण वाहनचोरीचे असल्याची माहिती आज गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

नव्या संहितेनुसार मध्यरात्री १२.२४ मिनिटांनी हजिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची माहिती स्वत: गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. हा गुन्हा ३०३ (२) नुसार दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याचे प्रकरण आहे. यापूर्वी हे कलम ३७९ नावाने ओळखले जात होते.

शहा म्हणाले, ग्वाल्हेर येथे रात्री १२.१० वाजता गुन्हा दाखल झाला. दिल्लीच्या प्रकरणाबाबत बोलायचे झाल्यास तेथील फेरीवाल्याविरुद्धचा खटला विचाराधीन आहे. पोलिसांनी नव्या संहितेनुसार प्रकरणाची पडताळणी केली असता ते प्रकरण फेटाळून लावले. गुन्ह्याची तारीख एक जुलैच्या अगोदर असेल तर त्यावर जुन्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल आणि नंतरची घटना असेल तर त्यावर नव्या संहितेनुसार खटला चालविला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

Phullwanti : "त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या रूममध्ये झोपायचे" ; दिग्दर्शिका झालेल्या स्नेहल तरडे यांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास

Latest Marathi News Live Updates: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ केलेले पाच पोलिस पुन्हा सेवेत

SCROLL FOR NEXT