Arvind Kejriwal Esakal
देश

Arvind Kejriwal: 'अटकेनंतर केजरीवालांनी राजीनामा द्यावा की, तुरुंगातून...', भाजपला मात देण्यासाठी आपने शोधली नवी युक्ती

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्यावरून आम आदमी पक्षाने भाजप आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अबकारी प्रकरणात अटक झाल्यास त्यांनी तुरुंगातून सरकार चालवावे किंवा राजीनामा द्यावा, या मुद्द्यावर आम्ही 'मै भी केजरीवाल अभियान' राबवून लोकांमध्ये जाऊन त्यांचे मत घेऊ, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. ही मोहीम 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दिल्लीतील सर्व 2600 मतदान केंद्रांवर चालणार आहे.(Latest Marathi News)

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्यावरून आम आदमी पक्षाने भाजप आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. या प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे (आप) नेते गोपाल राय आणि राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली आणि अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ पक्ष स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. (Marathi Tajya Batmya)

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा की नाही? यावर आम आदमी पक्ष सार्वमत चाचणी घेण्यात येणार आहे. मोदी सरकारने केजरीवालांना अटक केली तरी जेलमधून सरकार चालवण्याचं केजरीवाल यांना आवाहन केलं जाणार आहे.(Latest Marathi News)

आजपासून म्हणजे १ ते २० डिसेंबरपर्यंत आपचे कार्यकर्ते घरोघरो जाऊन लोकांच्या सह्या घेऊन सार्वमत चाचणी घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आले होते आणि त्यांचीही ED चौकशी केली जाणार आहे. याआधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडीने अटक केली आहे. जनतेचा कौल काय असेल यावर पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहती आहे. पोल घेतल्यानंतर त्याचा निकाल पत्रकार परिषद घेऊन आपकडून जाहीर केला जाणार आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT