Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : देशाच्या युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा; मोदींचा निर्धार

स्वातंत्र्याच्या अमृतकाळाकडून शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आम्हाला देशाच्या युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

मंगेश वैशंपायन

स्वातंत्र्याच्या अमृतकाळाकडून शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आम्हाला देशाच्या युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या अमृतकाळाकडून शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आम्हाला देशाच्या युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. गुजरातच्या जनतेने तर विजयाच्या विक्रमाचाही विक्रम केला व नरेंद्रचा विक्रम भूपेंद्रने मोडला असे त्यांनी नमूद केले. जेथे भाजपला विजय मिळाला नाही तेथे भाजपची मतांची लक्षणीयरीत्या वाढलेली टक्केवारी हीच भाजपवरील प्रेमाची साक्षीदार आहे असे सांगून मोदींनी हिमाचल प्रदेश व दिल्लीच्या पक्षकार्यकर्त्यांना दिलासा दिला.

देशातील महिलावर्गाचे प्रचंड समर्थन भाजपला मिळते कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखादा पक्ष महिलांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. देशात ७० वर्षांत कोणत्याही सरकारने राबविल्या नव्हत्या एवढ्या महिला केंद्रीत योजना फक्त भाजपने राबविल्या आहेत. भाजपच्या प्रत्येक मोठ्या योजनेचे प्राणतत्व' महिला सशक्तीकरण' हाच आहे. त्यामुळे आज भाजपला महिलांची सर्वाधिक मतेच नव्हेत तर त्यांचा आशीर्वादही मिळत आहे.

मोदी म्हणाले की जनसंघापासून पाच पाच पिढ्यांच्या तपश्चर्येतून निर्माण झालेल्या भाजपचे हे यश लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या जीवभराच्या त्यागाचे फळ आहे. भाजपने आपल्या राजकीय प्रवासात आदर्श व मूल्यांवर ठाम राहण्याचे व्रत कायम ठेवले. शौचालय, पाणी, वीज यासारखे प्रत्येक काम मोठ्या ‘लक्ष्या‘च्या प्राप्तीचे माध्यम बनते.

गुजरातेत रिंगमात उतरलेलेया आपचा नामोल्लेख न करता मोदी कडाडले की जे स्वतःला तटस्थ म्हणवतात ते निवडणुकीत कसेकसे रंग बदलतात, कसे खेळ खेळतात हे देशाला समजू लागले आहे. उत्तराखंड, गुजरातमध्ये किती लोकांची जमानत जप्त झाली याची काही चर्चा होत नाही. लोकांनी हे ओळखावे की हही ठेकेदार आहेत,असा हल्लाबोल त्यांनी आप वर केला. राजकारणात सेवाभावाने एखादा मुख्यमंत्री काम करतो तो त्याचा अपराध ठरतो, हे काय दिवस आलेत? या ठेकेदारांचा ‘तराजू‘च वेगळा आहे असे त्यांनी सांगितले.

या विजयानंतर आता आम्हाला सहनशक्ती वाढवावी लागेल. कारण विरोधक भाजपचा हा विजय पचवू शकणार नाहीत. सेवाभाव, समर्पणाच्याच रस्त्याने भाजपला पुढे न्यायाचे आहे.

मोदींच्या एकहाती नेतृत्वाखालील गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात मोठ्या संख्येने जमलेल्या, मोदी मोदी असा गजर करणाऱया पक्षकार्यकर्त्यांना मदींनी संबोधित केले. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथसिंह व्यापीठावर होते.

नड्डा म्हणाले की मोदींच्या नेतृत्वाखालील' विकासवादा‘ला मिळालेला हा विजय अविस्मरणीय आहे. भाजपला गुजरातमध्ये ५२.५ टक्के मते मिळाली. घराणेशाही व निष्‍करियता ही वैशिष्ट्ये असलेल्या कॉंग्रेसची घसरण झाली. नड्डा यांनी ‘आप'वर घणाघात केला. गुजरातचा अपमान करण्यासाठी आलेल्या नव्या पक्षाच्या नेत्याने लेखी भविष्यवाणी केली होती. मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱया या पक्षाच्या खोटारड्या नेत्याने देशाची माफी मागावी असा हल्लाबोल त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केला. जो स्वतःला जाहीरपणे कट्टर प्रामाणिक म्हणवतो तो सर्वाधिक बेईमान असतो असेही नड्डा कडाडले. नड्डा यांच्या गृहराज्यात, हिमाचल प्रदेशातही भाजपचा पराभव झाला. मात्र भाजपचा मतटक्का लक्षणीय वाढला हे उल्लेखनीय आहे असे सांगताना नड्डा म्हणाले की दिल्लीतही भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहेनत केली. त्याच वेळी दिल्लीच्या सरकारने महापालिकेचे ७२० कोटी, शिक्षणासाठीचे ४५० कोटी व अन्य कोट्यवधींची देणी थकविली.

मोदी म्हणाले -

- भाजपला मिळालेला जनादेश भारताच्या युवकांच्या तरूण विचारांचे प्रकटीकरण, विकासाच्या राजकारणाला दिलेला कौल, गरीब, दलित, शोषित, आदिवासींचे सशक्तीकरण यासाठी आहे.

- भाजपला मिळालेले जनसमर्थन यासाठीही महत्वाचे यासाठी की भारत अमृतकाळात प्रवेश करत आहे. येणारी २५ वर्षे विकासाच्याच राजकाणाची राहतील.

- देशाच्या विकासासाठी मोठ्यात मोठे व कठोरात कठोर निर्णय घेण्याची हिंमत फक्त भाजपमध्ये आहे.

- घराणेशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधातील जनआक्रोश सातत्याने वाढत आहे हाही भाजपच्या विजयाचा अर्थ आहे.

- मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवाला ताकद दिली हे निवडणूक आयोगाचे यश आहे. या निवडणुकीत दोन्ही राज्यांतील एकाही मतदान केंद्रांवर फेरमतदानाची वेळ आली नाही.

- हिमाचल प्रदेशात अवघ्या एका टक्क्याने भाजपचा पराभव झाला याचा अर्थ जनतेनेही भाजपला विजयी बनविण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. सत्तेत भाजप मागे राहिली तरी राज्याच्या विकासाबाबत आमची शंभर टक्के प्रतिबध्दता राहील हे मी हिमाचलच्या जनतेला सांगू इच्छितो.

- दिल्ली महापालिकेत जनतेबरोबर धोका केला गेला, अशी कामे आम्ही करणार नाही.

- गुजरातने तर यावेळी कमालच केली. गुजरातच्या इतिहासात सर्वांत प्रचंड जनादेश भाजपला दिला.

- गुजरातेत जाती, वर्ग आदी भेदांच्या पलीकडे जाऊन लोकांनी भाजपला मते दिली. गुजरातच्या प्रत्येक घराचा भाजप हा घटक आहे.

- गुजरातमध्ये यंदा १ टक्का मतदार असे होते ज्यांनी प्रथमच मतदान केले व त्यांनी भाजपशिवाय कोणाची सत्ता पाहिलेलीच नव्हती. म्हणजेच देशाच्या युवकांना जातीवाद, घराणेशाही यापेक्षा भाजपचे विकासवादी, प्रतिबध्द राजकारण याबद्दल ओढ आहे.

- विकसित गुजरातमधून विकसित भारताची निर्मिती, ही भाजपची घोषणा होती.

-गुजरातेत आदिवासी समाजानेही भाजपवर प्रचंड मोठा विश्वास ठेवला.

- देश जेव्हा जेव्हा मोठी उद्दिष्टे निश्चित करतो तेव्हा देशवासीय भाजपवरच विश्वास ठेवतात हे पुन्हा दिसले.

- आज सरकारी योजनांचे लाभ त्याच्या खऱया हक्कदारांना मिळेल याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला.

- आम्ही फक्त राजकीय फायद्यांसाठी घोषणांसाठी घोषणा करत नाही. आमच्या प्रत्येक घोषणेमागे राष्ट्र निर्माणाचे दूरगामी लक्ष्य असते.

- देशाचा मतदार हे समजू लागला आहे की ‘शार्टकट' राजकारणाचे किती नुकसान देशाला होते. देश समृध्द होईल तर सर्वांची उन्नती निश्चित आहे.

आमच्या पूर्वजांकडे अनुभवाचे प्रचंड ज्ञान होते. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रूपय्या‘ असा प्रकार केला तर काय होते हे आम्ही आमच्या शेजारी देशांत पाहिले आहे. असल्या पोकळ निवडणूक घोषणांनी जनतेचे भले होत नाही तसेच समाजात फूट पाडून तत्कालीक लाभाचे राजकारण करतात त्यांना देशाची जनता, युवा पिढी पहाते आणि नीट समजतेही !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT