New Delhi G-20 conference based Vasudhaiva Kutumbakam in final stage Amitabh Kant Sakal
देश

G-20 Summit 2023 : ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित ‘जी-२०’ परिषदेचे ‘नवी दिल्ली घोषणापत्र’ अंतिम टप्प्यात - अमिताभ कांत

इंडोनेशियातील बालीमध्ये ‘जी-२०’ देशांची परिषद झाल्यानंतर या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित ‘जी-२०’ परिषदेचे ‘नवी दिल्ली घोषणापत्र’ अंतिम टप्प्यात असून, ते ‘जी-२०’च्या राष्ट्रप्रमुखांच्या सहमतीनंतर जाहीर केले जाईल, अशी माहिती ‘जी-२०’ परिषदेचे संचालन प्रमुख अमिताभ कांत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘नवी दिल्ली घोषणापत्र’ हे जागतिक दक्षिण व विकसनशील देशांचा एक भक्कम आवाज असेल, असा दावा करून अमिताभ कांत म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी इंडोनेशियातील बालीमध्ये ‘जी-२०’ देशांची परिषद झाल्यानंतर या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले.

गेल्यावर्षी अधोगतीला जाणारा विकास दर व घटत्या उत्पादनाने जगाला ग्रासले होते, त्या पार्श्वभूमीवर भारताकडे नव्या उमेदीने हे अध्यक्षपद आलेले आहे. या परिषदेची मुख्य संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे आहे. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या त्रिसूत्रीवर आधारित धारणेवर प्रगती करण्याचा मानस यात व्यक्त केला आहे.’’

मोदी यांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक, निर्णायक, महत्वाकांक्षी आणि कृती करणारे असल्याचा दावाही अमिताभ कांत यांनी केला. ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा मुख्य उद्देश जगाला एका वेगळ्या विकासाच्या मार्गावर नेण्याचा हा संकल्प राहणार आहे.

शाश्वत विकास व हवामान बदलांवर ‘जी-२०’ गटातील देश काय करू शकतात व त्यांना पुढील पिढीसाठी अधिक चांगले जग कसे बनवता येईल, यावर विचार केला जाणार आहे. ‘नवी दिल्ली घोषणापत्रा’च्या प्रती ‘जी-२०’ देशांच्या प्रमुखांना दिलेल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडून आलेल्या सहमतीनंतर हे घोषणापत्र जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अमिताभ कांत यांनी दिली.

ड्रॅगन आणि रशियाचा खोडा?

‘जी -२०’ देशांचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या भारताने तयार केलेल्या न्यू दिल्ली घोषणापत्रावर एकमत होण्याची शक्यता मावळत चालली असून चीन व रशिया हे देश वेगळी मते मांडून भारताच्या यशामध्ये खोडा घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘चीनने या घोषणापत्रावर जोरदार आक्षेप नोंदविला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेला चीनने विरोध केला आहे. मुळात ‘जी-२०’ परिषदेसाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना उपनिषदातून घेतली आहे. सर्व जग एक कुटुंब आहे, अशा अर्थाची सर्वसमावेशक संकल्पना असलेल्या या शब्दांवर चीनने आक्षेप घेतला आहे.

त्याचप्रमाणे या घोषणापत्रात रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर काही परिच्छेद आहे. सर्व देशांचे सार्वभौमत्व कायम राहिले पाहिजे, असे यात स्पष्ट केले आहे. यामुळे रशियानेसुद्धा या घोषणापत्राला सहमती दर्शविण्याबाबत असमर्थतता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ‘जी-२०’ परिषदेसाठी या दोन्ही देशांचे प्रमुख उपस्थित राहणार नाहीयेत. परंतु या देशांकडून रशियाचे विदेशमंत्री तर चीनचे पंतप्रधान हे प्रतिनिधी म्हणून हजर राहणार आहेत.

सध्याचे भूराजकीय वाद दूर सारून जागतिक नेत्यांच्या या बैठकीत सकारात्मक धोरण ठरविण्यात भारताला यश येईल, असा मला विश्‍वास आहे.

- अँटोनिओ गुटेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT