Dhananjay Chandrachud esakal
देश

Dhananjay Chandrachud : आपले सरन्यायाधीशही होते आकाशवाणीवर आर.जे!

वयाच्या विशीत आपण आकाशवाणीवर रेडिओ जॉकी (आर. जे) म्हणून काम केले आहे, असे गुपित भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकतेच उघड केले.

सकाळ वृत्तसेवा

वयाच्या विशीत आपण आकाशवाणीवर रेडिओ जॉकी (आर. जे) म्हणून काम केले आहे, असे गुपित भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकतेच उघड केले.

नवी दिल्ली - वयाच्या विशीत आपण आकाशवाणीवर रेडिओ जॉकी (आर. जे) म्हणून काम केले आहे, असे गुपित भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकतेच उघड केले. वाहिन्यांच्या ‘ साऊंड- लाईट- ॲक्शन' च्या ‘चमको‘ जगाला भाळून आकाशवाणी किंवा खासगी रेडिओ वाहिन्यांबाबत उदासीनता बाळगणाऱया आजकालच्या अनेक तरूणांसाठी सरन्यायाधीशांचा हा अनुभव बऱयापैकी पुरेसा बोलका ठरू शकतो.

‘इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च' संस्थेच्याच्या शैक्षणिक सत्राचे उद्घाटन करताना न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की त्यांनी विसाव्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ साठी रेडिओ जॉकी म्हणून काम करताना 'प्ले इट कूल', 'ए डेट विथ यू' आणि 'संडे रिक्वेस्ट' सारख्या आकाशवामी कार्यक्रमांचे निवेदन केले आहे. आपले संगीतावरील प्रेम आजही कायम आहे आणि संगीत ऐकल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही असेही त्यांनी सांगितले.

तरूण मित्रांना संबोधित करताना न्या.चंद्रचूड म्हणाले की 'माझे संगीतावरील प्रेम आजही कायम आहे. जेव्हा मी वकिलांचे ‘संगीत' संपवतो, तेव्हा मी घरी परतल्यावर संगीताचा आनंद अवश्य घेतो ! ‘वकिलांचे संगीत नेहमीच कानाला चांगले वाटत नसते, असेही न्या. चंद्रचूड यांनी हास्यकल्लोळात नमूद केले.

राष्ट्रीय विधी विद्यापीठांना भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे न्यायिक सामायिक परीक्षा (सीएलएटी) देणाऱया विद्यार्थ्यांच्या क्षमतेची चाचणी घेणे. त्यांच्या मते केवळ ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर कायद्यात करिअर करणे साऱयाच विद्यार्थ्यांना आवडते असे नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले. सीएलएटी परीक्षा देण्याच्या वेळचे आपले स्वतःचे काही अनुभवही न्या. चंद्रचूड यांनी यावेळी शेअर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT