नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जग चिंतेत असून आता या विषाणूची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या विषाणूचे दिल्लीत नव्यान चार, तर राजस्थानमध्ये आठ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 52 वर पोहोचली आहे. (Omicron cases in India go up-to 52 ) तर, जगातील पहिल्या ओमिक्रॉन रूग्णाच्या मृत्यूची नोंद ब्रिटनमध्ये सोमवारी करण्यात आली आहे. (Omicron First death recorded in UK )
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, परदेशातून आलेल्या एकूण 74 लोकांना आतापर्यंत LNJP रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 38 रुग्ण सध्या दाखल आहेत. त्यापैकी 35 कोरोना रुग्ण असून, त्यापैकी 5 ओमिक्रॉनचे रूग्ण आहेत. आतापर्यंत, LNJP मध्ये एकूण 6 रूग्णांचा ओमिक्रॉन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यापैकी 1 रूग्ण बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 52 वर
भारतातील ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण कर्नाटकमध्ये आढळून आला होता. त्यानंतर आता या विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण इतर राज्यांमध्येदेखील आढळून येत आहेत. (Omicron State wise count ) सध्या स्थितीत भारतात महाराष्ट्र 20, गुजरात 03, राजस्थान 17, कर्नाटक 03, दिल्ली 06, चंदीगड 01, आंध्रप्रदेश 01 तर केरळमध्ये 01 असे ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.