Amit Shah 
देश

New Laws: गुन्हे करुन परदेशात लपलेल्या गुन्हेगारांविरोधात आता खटला चालणार; झटपट शिक्षाही होणार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतात गुन्हे करुन परदेशात फरार झालेल्या किंवा परदेशातून कट कारस्थान रचलेल्या आरोपींविरोधात आता कोर्टात ट्रायल सुरु करता येणं शक्य होणार आहे. तसेच लवकरात लवकर खटला संपवून त्यांना शिक्षा ठोठावणंही सोपं होणार आहे. कारण नव्या फौजदारी कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली. (New Laws Criminals who have committed crimes and are hiding abroad will be prosecuted)

मुंबई हल्ल्याचा दाखला

अमित शहा म्हणाले, ट्रायल इन अॅबसेन्सियाची देखील तरतूद नव्या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की मुंबई बॉम्बस्फोटाप्रमाणं एखाद्या गुन्ह्यात किंवा कटात प्रत्यक्ष सहभागी असलेला गुन्हेगार जर परदेशात पळून गेला तर त्याच्या अनुपस्थितीत देखील खटला चालवला जाऊ शकतो. (Latest Marathi News)

सध्या हे गुन्हेगार प्रत्यक्ष हजर नसल्यानं ट्रायल सुरु होऊ शकत नव्हत्या. पण आता त्यांची भारतात येण्याची गरज भासणार नाही. कारण जर आरोपी ९० दिवसांत कोर्टात हजर झाला नाही तर पुढे ट्रायल सुरु होईल. एक सरकारी वकील त्याचा खटला लढेल आणि सुनावणी पूर्ण होऊन त्याला फाशी देखील होईल. यामुळं दुसऱ्या देशातून त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया वेगानं होईल, अशा प्रकारे या कायद्याचं स्टेटस आता बदलणार आहे.

तीन विधेयकं लोकसभेत मंजूर

दरम्यान, भारतीय न्याय (द्वितीय) संहिता २०२३, नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता २०२३, भारतीय साक्ष्य (द्वितीय) विधेयक २०२३ हे तीन फौजदारी कायदे लोकसभेत मंजूर झाले. CrPC मध्ये यापूर्वी ४८४ कलमं होती पण आता यामध्ये वाढ झाली असून आता ५३१ कलम असतील. यांपैकी १७७ कलमांमध्ये बदल करण्यात आले असून आणखी ९ कलम नव्यानं जोडण्यात आली आहेत. तर ३९ नवी उपकलमं जोडण्यात आली आहेत. तर ४४ नवी तरतुदी जोडण्यात आल्या आहेत.

१५० वर्षांपूर्वीचे कायदे बदलले

या नव्या कायद्यांची माहिती देताना अमित शहा म्हणाले, या सभागृहात मी तीन कायदे घेऊन उपस्थित झालो आहे. कायद्यात बदल करण्याची ही एक अशी संधी आहे जेव्हा आपलं संविधान ७५ वर्षामध्ये पदार्पण करत आहे. तसेच ही अशी संधी आहे की नुकतेच आपल्याकडं महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण विधेयक मंजुर झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

याच पार्श्वभूमीवर आपल्याकडील सुमारे १५० वर्षांपूर्वीचे कायदे जे आपल्या फौजदारी न्याय प्रणालीत वापरले जातात. या तिन्ही कायद्यात मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीयता, भारतीय संविधान आणि भारतीय जनतेची काळजी करणारे अमुलाग्र बदल घडवून आणणारे कायदे घेऊन मी आलो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वत:ला विजेचा शॉक देऊन संपवलं जीवन... कामाच्या दबावामुळे होता नैराश्यात! पोलिसांची धक्कादायक माहिती

IND vs BAN 1st Test : ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं; Team India साठी ठरला ऐतिहासिक विजय

शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी

Latest Maharashtra News Live Updates: सीए तरुणीचा मृत्यू, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल

Tumbbad 2 : तुंबाड 2 मधून दिग्दर्शक राही अनिल बर्वेची एक्झिट ; केली नव्या दोन प्रोजेक्टसची घोषणा

SCROLL FOR NEXT