New Parliament 
देश

New Parliament: 'मी PM मोदींचे अभिनंदन करतो...', नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्याला ४ विरोधी पक्षांचा पाठिंबा

एकिकडे देशभरातील १९ पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे ४

धनश्री ओतारी

एकिकडे देशभरातील १९ पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे ४ विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान या सोहळ्यावरुन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. (New Parliament Building Inauguration 4 opposition parties support Modi government )

या इमारीतचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु त्यांच्या हस्ते उद्घानट करु नये, त्यांच्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. अशातच, ४ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्याला पाठिंबा दर्शवला आहे.

पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP पक्षही उद्धाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्धाटन सोहळ्याला हजर राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

जगन मोहन रेड्डी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. "भव्य आणि प्रशस्त संसद भवन राष्ट्राला समर्पित केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे, ती आपल्या देशाचा, आपल्या लोकांचा आणि सर्व राजकीय पक्षांचा आत्मा प्रतिबिंबित करते.

अशा शुभ सोहळ्यावर बहिष्कार टाकणे लोकशाहीच्या खर्‍या भावनेत नाही. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी या गौरव सोहळ्यास उपस्थित राहावे अशी माझी विनंती आहे. लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने माझा पक्ष या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.

'या' राजकीय पक्षांनी टाकला बहिष्कार

आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT