New Parliament Building sakal
देश

New Parliament Building : नव्या संसद भवनाच्या दुसऱ्या टप्प्यात कशावर असणार फोकस, जाणून घ्या

संसद भवनाची एक झलक पाहून फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगात या वास्तूची चर्चा सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

New Parliament Building देशात आता नवं संसद भवन बांधण्यात आलंय. या संसद भवनाची एक झलक पाहून फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगात या वास्तूची चर्चा सुरू झाली. आता त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात संसद भवनाच्या कलेकडे विशेष लक्ष दिलं जाईल. कलेच्या क्षेत्रातही भारतीय परंपरा आणि स्वातंत्र्य चळवळीतील शौर्यगाथा यावर भर देण्यात येणार आहे.

मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसद भवनातील आर्ट साइडचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागू शकतं. पुढच्या टप्प्यात डायनिंग हॉल सुशोभित करण्यासाठी कलाकृतींशिवाय सुमारे आठ नव्या दालनाची निर्मिती करण्यात येणार आहे. IGNCA अर्थात इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स ऑफ कल्चर मंत्रालय हा प्रकल्प पूर्ण करत आहे.

भारतासाठी अभिमानास्पद असलेली कलाकुसर

नवीन संसद भवनात सुमारे 5,000 कलाकृतींचा मोठा संग्रह करण्यात आला आहे. यात स्वातंत्र्य चळवळ आणि भारतीय परंपरा यांच्याशी सुसंगत वस्तू असणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या एका अहवालात, IGNCA सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांनी सांगितलं की, लोकसभेच्या वरच्या मजल्यावर सर्वात अनोखी गॅलरी बांधण्यात आली आहे.

याला “द बॅटल ऑफ ऑनर, बिफोर 1857” असं नाव देण्यात आलंय. इथे आणखी एक गॅलरी तयार केली जाईल, जिथे स्वातंत्र्यलढ्याच्या (1857 ते 1947) कथांवर प्रकाश टाकला जाईल.

महिला आणि आदिवासींना समर्पित गॅलरी

IGNCA नुसार, पहिल्या मजल्यावर दोन गॅलरी असतील, ज्यामध्ये एक देशाच्या विकासात महिलांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करेल आणि दुसरी स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासी नेत्यांच्या भूमिकेची कथा सांगेल. लोकांमध्ये ज्ञान आणि प्रेरणा जागृत करणे हा या गॅलरीचा उद्देश आहे.

ज्ञान आणि भक्तीचा प्रवाह राज्यसभेच्या पटलावर

संसद भवनात स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मा आणि महापुरुषांच्या गौरवासोबतच देशाच्या भक्तीपरंपरेवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. राज्यसभेच्या मजल्यावरील या दालनांमध्ये देशातील ज्ञान आणि भक्तीपरंपरेची झलक पाहायला मिळणार आहे.

पहिल्या मजल्यावर निसर्ग आणि पारंपारिक खेळांशी संबंधित चित्र लावली जातील. इमारतीच्या इतर भिंती श्लोक आणि इतर पवित्र चिन्हांनी सुशोभित केल्या जातील.

भारतातील संस्कृतीची झलक

IGNCA सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्व प्रदेश आणि राज्यांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. विविध समाजातील कला आणि संस्कृतीला इथे स्थान दिले आहे. विविधतेत एकता हा विचार करूनच सर्वाची निर्मिती केली जाणार आहे.

मध्यवर्ती चौकात सुशोभित केलेल्या भिंतीला जन जननी जन्मभूमी असे नाव देण्यात आले आहे. येथे 75 महिला कारागिरांनी 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारी कलाकुसर केली आहे.

त्याचवेळी, शिल्प दीरघा नावाच्या गॅलरीत, देशभरातील 400 कारागिरांकडून मिळवलेल्या 250 हून अधिक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी भारतीय परंपरा आणि दिग्गज कलाकारांचाही समावेश करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या या कला प्रकल्पाची किंमत 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT