new parliament
new parliament esakal
देश

PM Modi : जुन्या संसद भवनात मोदींना नालंदा विद्यापीठाची आठवण; म्हणाले, G20 परिषदेत...

संतोष कानडे

नवी दिल्लीः मंगळवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीमध्ये कामकाजाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी जन्या संसद भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थित सदस्यांना संबोधित केलं.

जुन्या संसद भवनामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार करुन त्यांनी अनेक महापुरुषांना अभिवादन केलं. यावेळा बोलताना मोदींनी जुन्या संसद भवनाला आता संविधान भवन म्हटलं जाईल, अशी घोषणा केली.

देश विविध पातळ्यांवर प्रगती करत आहे, आपल्याकडे केवळ लोकसंख्या नाही तर तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येणारा काळ भारताचा आहे. जगभरात स्वतःचं उत्पादन पोहोचवण्यासाठी गुणवत्तेवर भर द्यावा लागले, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान बोलले की, प्रत्येक क्षेत्राचे वैश्विक मापदंड लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. जगात माझं प्रॉडक्ट कसं चालेल, याचा विचार करुन पावलं टाकावी लागतील.

''आज शिक्षण क्षेत्रामध्ये आपण प्रगती करतोय. नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी देशाला मिळाली आहे. त्याच आधारावर आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे'' हे मोदींनी सांगितलं.

नालंदा विद्यापीठाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या देशाला शिक्षणाची मोठी परंपरा आहे. जी-२० परिषदेमध्ये नालंदाचा एक फोटो ठेवला होता. आलेल्या देशोदेशीच्या पाहुण्यांना सांगितलं, १५०० वर्षांपूर्वी माझ्या देशात सर्वोत्तम युनिव्हर्सिटी होती. हे सांगितल्यानंतर तेही आश्चर्याने ऐकत होते.

या शैक्षणिक परंपरेतून भारताला पुढे जायचं असून तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. क्रीडा विश्वामध्येही देश प्रगती करत असल्याचं मोदींनी सांगितलं. मोदींच्या भाषणानंतर उपस्थित सदस्य जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनामध्ये दाखल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokan News: कोकणच्या रौद्र सौंदर्याची पर्यटकांना ओढ, मात्र काळजी न घेतल्यास...; वाचा महत्वाची बातमी

France Election: फ्रान्समध्ये निकालाआधी हिंसा उसळली! अनेक ठिकाणी जाळपोळ; 30 हजार सैनिक तैनात

Mumbai Heavy Rains: मुंबईकरांनो सावधान! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, IMD ने दिला इशारा

Riteish- Jenelia: एकच मन आहे, किती वेळा जिंकाल! रितेश- जिनिलियाचा मोठा निर्णय, होतोय कौतुकाचा वर्षाव

Maharashtra Live News Updates : निसर्गाची कृपादृष्टी राहावी म्हणून आदिवासी गावांमध्ये नेवती पूजनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT