omicron omicron
देश

ओमिक्रॉन डेल्टापेक्षा फास्ट, दीड ते तीन दिवसात रूग्णसंख्या दुप्पट - WHO

वाढत्या रूग्ण संख्येमुळे काही देशांl रूग्णालये कमी पडतील अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : ओमिक्रॉन विषाणूची (Omicron Variant) लागण होण्याचा दर हा डेल्टापेक्षाही वेगवान (Omicron faster than Delta Variant) असून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि सामूहिक संसर्ग झालेल्या देशांत याची झपाट्याने वाढ होत आहे. सामूहिक संसर्ग झालेल्या देशांमध्ये याची लागण होण्याच्या संख्या दीड ते तीन दिवसांत दुप्पटीने वाढली आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी दिली आहे. (Omicron variant spreading faster than Delta, cases doubling in one and a half to three days WHO)

दरम्यान, मर्यादित डेटामुळे ओमिक्रॉनवर लसीचा प्रभाव (Covid Vaccination Data ) कसा आहे हे सांगणे आताच्या घडीला कठीण असून आतापर्यंत 89 देशांमध्ये ओमिक्रॉन (Omicron recorded in 89 country ) व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनचाप्रसार अधिक लोकसंख्या (Large Population) असलेल्या देशांतील नागरिकांमध्ये होत असून त्याचा प्रभाव नागरिकांच्या प्रतिकारशक्तीवर ( Immunity) होत आहे. मात्र, अद्यापपर्यंत हे विषाणूची प्रतिकारशक्ती टाळण्याची क्षमता, त्याची अंतर्निहित वाढलेली संक्रमणता अथवा या दोन्हींच्या संयोजनामुळे होत आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे WHO ने स्पष्ट केले आहे.

ओमिक्रॉनच्या (Omicron) तीव्रतेबाबत हाती असलेला डेडा हा मर्यादित असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या विषाणूची तीव्रता तसेच लसीकरण आणि त्यापूर्वीची प्रतिकारशक्तीवर या विषाणूचा काय प्रभाव पडतो हे अभ्यासण्यासाठी आणखी डेटाची आवश्यकता आहे. ओमिक्रॉन विषाणूवर (Omicron) सध्याच्या लसींचा प्रभाव किंवा परिणामकारकतेबाबत मर्यादित डेटा उपलब्ध असून त्याबाबात ठोस पुरावे नसल्याचे WHO ने स्पष्ट केले आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे काही देशांमध्ये रूग्णालयांमध्ये (Hospitals) जागा कमी पडेल अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे युके आणि दक्षिण अफ्रिकेतील (UK And South Africa) रूग्णांलयांमध्ये रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT