Abhisar misra_Urmilesh 
देश

NewsClick: अभिसार शर्मा, उर्मिलेश यांच्यासह 9 पत्रकारांवर UAPA दाखल; सेटलवाड यांच्या घरी मुंबई पोलीस

चीनच्या मदतीनं मोदी सरकारविरोधात अजेंडा चालवल्याचा आरोप या पत्रकारांवर करण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

News Click China Funding : न्यूजक्लीक या न्यूज पोर्टलशी संबंधित 9 पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी सकाळी छापेमारी केली. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अर्थात UAPA कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली असून यामध्ये मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. (News Click China Funding Case UAPA filed against 9 journalists including Abhisar Sharma Urmilesh)

ताज्या माहितीनुसार, न्यूजक्लीकसंदर्भातील ठिकाणांवर दिल्ली पोलिसांनी जी छापेमारी केली आहे. यासंदर्बात १७ ऑगस्ट रोजी भादंवि UAPA (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) आणि १५३ अ (दोन गटातील द्वेषाला प्रोत्साहन देणं) तसेच १२० ब (गुन्हेगारी कट) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

कोणावर कारवाई?

वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा, उर्मिलेश, एनडीटीव्हीचे माजी एमडी अवनिंदो चक्रवर्ती आणि इतर सहा पत्रकारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विविध ३० ठिकाणी छापेमारी टाकून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Marathi Tajya Batmya)

तसेच तीस्ता सेटलवाड यांच्या मालमत्तेवरही छापे टाकण्यात आले आहेत. हे सर्वजण न्यूज क्लीक या न्यूज पोर्टलशी संबंध असलेले पत्रकार आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कॉमेडियन संजय राजौरा यांना देखील दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली आहे.

नव्यानं UAPA दाखल

या प्रकरणात यापूर्वी ईडीनं पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिपब्लिक टिव्हीनं याबाबत माहिती दिली आहे. न्यूजक्लीक 2021 पासून कथीत बेकायदेशीर परदेशी फंडिंग मिळवल्याबद्दल पोलिसांच्या रडावर होतं.

यावेळी पत्रकार अभिसार शर्मा या पोर्टलसाठी काम करत होते. सामाजिक कार्यकर्ते तीस्ता सेटलवाड आणि गौतम नवलखा यांच्यावरही चीनकडून न्यूजक्लीकद्वारे मिळालेला फंड घेतल्याचा आरोप आहे.

अभिसार शर्मांचा दुजोरा

दरम्यान, अभिसार शर्मा यांनी स्वतः आपल्यावरील कारवाईची माहिती देणारं ट्विट केलं आहे. दिल्ली पोलीस माझ्या घरी पोहोचले असून माझा लॅपटॉप आणि मोबाईल त्यांनी जप्त केला आहे, असं त्यांनी यामध्ये म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT