नवी दिल्ली : 'व्हॉइस ऑफ हिंद' प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेने मुस्लिम तरुणांना भारतात हिंसक जिहादच्या भरती करण्यासाठी ऑनलाईन कॅम्पेन चालवल्याचा खूलासा केला आहे. (ISIS Run Online Campaign For Recruitment )
एनआयएने या प्रकरणी इसिसचे दोन दहशतवादी अफशान परवेझ जराबी आणि तौहीद लतीफ सोफी यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून, दोघेही जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचे रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या विविध कलमांखाली दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. ऑन-ग्राउंड टेरर फायनान्सिंग फाइनेंसिंगद्वारे सायबर स्पेसवर मोहीम सुरू करण्यात आली होती, जेणेकरून नापाक योजना राबवता येतील असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.
आरोपी परवेझ इसिसचा प्रमुख
एनआयएने म्हटले आहे की, आरोपी परवेझ हा आयएसआयएसचा प्रमुख तर, दुसरा आरोपी उमर निसारचा जवळचा सहकारी असून, तो AF-Pak (अफगाणिस्तान-पाकिस्तान) आधारित ISIS च्या कार्यकर्त्यांशी देखील संपर्कात होता तसेच ISIS साठी भरती करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी असल्याचे एनआयने म्हटले आहे. उमर निसारच्या अटकेनंतर, त्याला भारतातील ISIS गतिविधींसाठी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यासाठी तो विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सक्रियपणे ISIS च्या प्रचार सामग्रीचा प्रसार करत होता.
'हिंदू मंदिरे, सरकारी इमारतींची करायचा रेकी'
एनआयएच्या म्हणण्यानुसार, यातील आणखी एक आरोपी तौहीद लतीफ सोफी हा उमर निसार आणि जुफरी जवाहर दामुदीचा जवळचा सहकारी होता. 'व्हॉइस ऑफ हिंद' या आयएसआयएस प्रोपगंडा मॅगझिनसाठी कंटेंट संपादित करण्यात आणि पोस्टर बनवण्यात सोफीचा सहभाग असल्याचे एनआयएने म्हटले आहे. यासोबतच तो विध्वंसक कृत्ये करण्यासाठी हिंदू मंदिरे, पोलीस ठाण्यांसह सरकारी इमारतींची रेकी करत असे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.