Popular Front of India PFI esakal
देश

PFI वर पुन्हा मोठी कारवाई; 8 राज्यांत 200 ठिकाणी छापे, 170 जण ताब्यात

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात कारवाई सुरूच आहे.

सकाळ डिजिटल टीम

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात कारवाई सुरूच आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India PFI) विरोधात कारवाई सुरूच आहे. आज (मंगळवार) सकाळी सुमारे 170 सदस्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे. यादरम्यान पोलिसांनी सात राज्यांमध्ये छापे टाकले आहेत.

अलीकडंच, राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयानं (ED) 13 राज्यांमध्ये छापे टाकले आणि 100 हून अधिक PFI कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राज्य पोलीस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात (Maharashtra) शोध घेत असल्याचं वृत्त आहे. हिंसक निदर्शनासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आल्याचं वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6 वाजेपर्यंत 8 राज्यांमध्ये 200 ठिकाणी छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. PFI सरकारी संस्था, नेते, भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) यांच्या संघटनेला लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. पीएफआयचे कार्यकर्ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवल्यानंतर संतप्त झाले आहेत.

Popular Front of India PFI

पीएफआयनं सरकारविरोधात हिंसक बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफआयनं 'बयाथीस'चा मार्ग निवडल्याचंही वृत्त आहे. हा एक अरबी शब्द आहे, याचा अर्थ 'फिदायीन' असा होता. जो आपल्या अमीरसाठी मरण्याची किंवा मारण्याची शपथ घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT