नवी दिल्ली - पाकिस्तानची दहशतवादी संघटना ‘जैश- ए- महंमद’ ला देशातून होणाऱ्या मदतीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, आसामसह २२ ठिकाणी छापे घातले.
यामध्ये महाराष्ट्रातील मालेगाव (जि.नाशिक), छत्रपती संभाजीनगर तसेच जालना या ठिकाणांचा समावेश आहे. ‘एनआयए’कडून मिळालेल्या माहितीनुसार, जैश- ए- महंमद या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत आणि दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान रचण्याच्या संशयावरून ‘एनआयए’ने पाच राज्यांमध्ये छापे घातले.
या संघटनेचे जम्मू-काश्मीरच्या बाहेर पसरलेले जाळे उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने करण्यात ही पहिलीच देशव्यापी कारवाई करण्यात आल्याचे समजते. ‘एनआयए’च्या पथकाने महाराष्ट्रातील मालेगावमध्ये होमिओपॅथी दवाखान्यावर छापा घातला. या छाप्यांमध्ये जालन्याच्या गांधीनगर भागातून दोन जणांना तर छत्रपती संभाजीनगरमधून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
राजधानी दिल्लीच्या मुस्तफाबाद भागामध्ये ‘एनआयए’च्या पथकाने काल रात्री दिल्ली पोलिसांसोबत छापा घातला. यात दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेताना काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे छापा घालून एकाला ताब्यात घेण्यात आले. दारुल उलूम जवळच्या एका भागामध्ये हा छापा घालण्यात आला होता. यात संशयिताचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.