राजधानीत रात्रीची संचारबंदी लागू sakal
देश

दिल्लीत रात्रीची संचारबंदी लागू

दिल्लीत यलो ॲलर्ट जारी; गर्दीवर निर्बंध आणि चित्रपटगृहे, बॅन्क्वेट हॉल बंद

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव (Omicron Variant) वाढल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘यलो ॲलर्ट’ लागू केला आहे. या ‘यलो ॲलर्ट’ (Yellow Alert) दक्षतेच्या इशाऱ्याअंतर्गत दिल्लीत रात्रीची संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली असून वाहतुकीवर तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर निर्बंध लागू झाले आहेत. दिल्ली मेट्रो, बस गाड्यांमध्ये निम्म्याच प्रवाशांना बसता येईल. तर चित्रपटगृहे, जीम, मल्टिप्लेक्स, बॅन्क्वेट हॉल, संमेलन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.

दिल्लीत दोन दिवसात कोरोना संक्रमणाचा दर ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने तत्काळ प्रतिसादात्मक प्रभावी उपाययोजनेंतर्गत यलो ॲलर्ट लागू करण्यात येत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. दिल्लीतील ओमिक्रॉनच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर केजरीवाल सांगितले, की कोरोनाच्या संभाव्य उपद्रवानंतर शास्त्रीय पद्धतीने निर्बंध लागू करण्यासाठी संभाव्य जुलैमध्ये प्रतिसादात्मक उपाययोजना आराखडा बनविला होता. या यलो ॲलर्टच्या मदतीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध लागू केले जात आहेत. या निर्बंधांबाबतचा तपशीलवार आदेश लवकरच जाहीर केला जाईल.

प्रतिसादात्मक उपाययोजना आराखड्यानुसार कोरोना संक्रमणाचा सलग दोन दिवसांमध्ये दर अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त राहिला तर यलो ॲलर्ट लावण्याचे सुचविण्यात आले असून यामध्ये रात्रीची संचारबंदी, शाळा, महाविद्यालये बंद करणे, जीवनावश्यक नसलेल्या साहित्याची दुकाने एक दिवसाआड उघडण्यास सांगणे, मेट्रो रेल्वे, बस गाड्यांमध्ये निम्म्या संख्येनेच प्रवाशांना बसण्याची परवानगी देणे यासारख्या उपाययोजनांचा समावेश होतो.

दिल्ली सरकार दहा पट अधिक सज्ज

दिल्लीकरांनी ओमिक्रॉनला घाबरून जाऊ नये, असेही आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. यात बहुतांश जणांमध्ये सौम्य लक्षणेच आढळून आली आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची, व्हेन्टिलेटर किंवा ऑक्सिजन बेड देण्याची गरज पडलेली नाही. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. यावेळी कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी दहा पट अधिक सज्जता सरकारने केली असल्याचा दावा करताना केजरीवाल यांनी मास्क वापरला जात नसल्याची नाराजीही बोलून दाखविली. केजरीवाल म्हणाले, की मास्क वापरण्याची सावधगिरी बाळगली जात नसेल तर बाजारपेठा बंद कराव्या लागतील आणि याचा फटका बसू शकतो, असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT