Nilesh Lanke Oath
Nilesh Lanke Oath  esakal
देश

Nilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर निलेश लंकेंची दणक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, मला त्यांनी...

संतोष कानडे

नवी दिल्लीः नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी इंग्रजीचा मुद्दा भलताच गाजला होता. निलेश लंकेंनी चार शब्द इंग्रजीमध्ये बोलून दाखवावेत, अशी टीका विरोधी गटाकडून झाल्यानंतर निलेश लंकेंनी ती वेळ सावरुन नेत, जनतेची बाजू मांडणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी इंग्रजीतच शपथ घेणार, असं चॅलेंज स्वीकारलं होतं.

२४ जूनपासून १८ व्या लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि इतर कॅबिनट मंत्र्यांनी शपथ घेतली. मंगळवार,दि. २५ जून रोजी महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी निलेश लंकेंनी इंग्रजीतून पदाची शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'जय राम कृष्ण हरी' असं म्हणत लंकेनी आपल्या शपथेचा शेवट केला. यावेळी उपस्थित खासदारांनी त्यांना दाद दिली.

शपथ घेतल्यानंतर निलेश लंकेंनी 'साम टीव्ही'शी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये माझ्यावर टीका झाली होती. मी चार शब्द इंग्रजीमधून बोलून दाखवावेत, असं चॅलेंज मला देण्यात आलं. त्याला उत्तर देताना मी म्हटलं की, तुम्हाला संसदेत बाजू मांडणारा खासदार पाहिजे की फक्त इंग्रजीत बोलणारा खासदार पाहिजे? लोकांनी मला साथ दिली आणि मी निवडून आलो.

निलेश लंके पुढे म्हणाले की, निकाल लागल्यानंतर मी इंग्रजीत शपथ घेणार असं जाहीर केलं होतं. माणूस पाण्यात पडल्यानंतरच पोहायला शिकतो, आईच्या पोटात कुणीही काही शिकत नाही. आज इंग्रजीमध्ये शपथ घेतली भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सभागृह बंद पाडू.

दरम्यान, निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अनेक खासदारांनी ट्वीट करुन लंकेंना प्रोत्साहन दिलं. सगळ्यात अगोदर अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलं होतं, असं लंकेंनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

Gayatri Mantra: निता अंबानींच्या लाल साडीवर सोनेरी रंगात लिहिलेल्या गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे

Maharashtra Live News Updates : पंतप्रधान असोत किंवा सभागृहाचे अध्यक्ष, मल्लिकार्जुन खरगेंचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी- शरद पवार

Namrata Sambherao : हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने बांधलं नवं घर ; फोटो शेअर करताना म्हणाली "विश्वास हा सगळ्या गोष्टी..."

SCROLL FOR NEXT