nipah virus esakal
देश

सावधान! कोरोनापेक्षाही खतरनाक आहे निपाह व्हायरस; सरकारने दिला धोक्याचा इशारा

संतोष कानडे

Nipah Virus : देशामधल्या काही भागामध्ये निपाह व्हायरसने डोकं वर काढलं आहे. केरळमध्ये आढळलेल्या काही केसेसनंतर सरकारने काही आकडेवारी जारी केलीय. ही धोक्याची घंटा असून आयसीएमआरचे डीजी राजीव बहल यांनी मृत्यूदर जास्त असल्याचं म्हटलं आहे.

निपाह व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृ्त्यूचा दर ४० ते ७० टक्के असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनामध्ये बाधितांच्या मृत्यूचा दर २ ते ३ टक्के इतकाच होता. राजीव बहल यांनी सांगितलं की, निपाह व्हायरस रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

शुक्रवारी आयसीएमआरच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तीत बोलताना बहल पुढे म्हणाले की, आमच्याकडे फक्त १० रुग्णांसाठी मोनोक्लोनल अँटिबॉडी खुराक आहेत. आतापर्यंत याचा डोस कुणालाही देण्यात आलेला नसून भारताने आणखी २० खुराक मागितले आहेत.

दिवसेंदिवस संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केरळ सरकाने त्या सर्व लोकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत जे पहिल्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते.

राज्याच्या आरोग्य खात्याने शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, निपाह व्हायरसमुळे संक्रमित झालेला ९ वर्षांचा मुलगा व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. त्याच्याशिवाय इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. 'लाईव्ह हिंदुस्तान'ने हे वृत्त दिले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT