नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दावा केला आहे, की त्यांनी नागपूर (Nagpur) येथील एका सरकारी कंपनीला खासगीकरण होण्यापासून वाचवले आहे. गडकरी म्हणतात, मॅगनीज ओर इंडिया लिमिटेडला (MOIL-माॅईल) खासगीकरणापासून वाचवले आहे. रविवारी दुपारी येथे माॅईल कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते. निर्गुंतवणुकीबाबत निर्णय घेणाऱ्या समितीचा हिस्सा असून सर्व फाईल्स विचारासाठी आपल्याकडे येतात, असे गडकरी म्हणाले. जेव्हा त्यांना माॅईलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मिळाला, तेव्हा त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणकडे हे प्रकरण नेले आणि या वेळेस माॅईलला यापासून दूर ठेवले जावे, अशी विनंती केली. (Nitin Gadkari Claims He Save Moil Government Company From Privatization)
माॅईल एक शेड्यूल ए मिनिरत्न सार्वजनिक उपक्रम कंपनी आहे. ती मॅग्नीज धातूची सर्वात मोठी देशांतर्गत उत्पादक कंपनी आहे. ज्याचा वापर मुख्यतः स्टील बनवण्यासाठी केला जातो. ती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ११ खाणींमधून मॅग्नीज काढण्याचे काम करते. माॅईलजवळ देशातील मॅग्नीज धातूचा ३४ टक्के हिस्सा आहे. देशाअंतर्गत ४५ टक्के योगदान देते. कंपनीचे लक्ष्य आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत आपले उत्पादन जवळपास दुप्पट करुन २५ लाख मॅट्रिक टन करण्याचे आहे. माॅईल गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशाच्या इतर प्रदेशांमध्ये व्यवसायाची संधी शोधत आहे. गडकरी यांनी माॅईलच्या कामगिरीचेही कौतुक करुन म्हणाले, कंपनीला देशात मॅग्नीजचे आयात करण्यासाठी उच्च प्रतीचे उत्पादन आणि विकासासाठी प्रयत्न करायला हवे. त्यांनी माॅईल व्यवस्थापनाला उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे.
गडकरींनी माॅईलला दिला इशारा
सद्यःस्थितीत माॅईलकडे वार्षिक उत्पादन १५ लाख टनांपर्यंत नेण्याची मंजुरी आहे. तिचे वर्तमान उत्पादन १२ टनांपेक्षा अधिक आहे. गडकरी म्हणाले, की आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी मॅग्नीज निर्यात वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी ८० लाख टनांपर्यंत उत्पादन घेऊन जावे लागेल. त्यांनी माॅईलला विस्तारात गुंतवणूक करण्यास सांगितले. या वेळी त्यांनी इशाराही दिला. जर असे झाले नाही, तर तो दिवस दूर नाही जेव्हा कंपनी कोणत्यातरी खासगी समुहाला विकली जाईल. सरकारी कंपन्यांचा तोटा हे जनतेचे नुकसान आहे. शेवटी करदात्यांच्या पैशातूनच भरपाई केली जात आहे. त्यामुळे कंपन्यांनी कामगिरीवर भर द्यावा. नाहीतर अस्तित्व धोक्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.