केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार सर्व वाहनांसाठी सहा एअरबॅग अनिवार्य करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी राज्यसभेत काँग्रेस खासदार केटीएस तुलसी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आता इकॉनॉमिक मॉडेलसाठी देखील सहा एअरबॅग अनिवार्य असणार आहेत. (6 Airbags Mandatory in All Passenger Cars)
नितीन गडकरी यांनी सभागृहात सांगितले की, इलेक्ट्रिक वाहने (EVs) सरकारने ठरवून दिलेल्या सुरक्षा स्टँडर्ड्सनुसार तयार केली पाहिजेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारतातील सुरक्षा स्टँडर्ड जागतिक स्टँडर्सच्या बरोबरीचे आहेत. तसेच भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात, त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो असे देखील त्यांनी पुढे बोलताना सांगतीले. दरम्यान देशात काही इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याच्या घटना समोर आल्यानंतर सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे अशा वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी, गडकरी यांनी प्रादेशिक अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गांच्या (National Highways) प्रकल्प संचालकांना चालू प्रकल्पांमध्ये योग्य रस्ते सुरक्षा उपायांची खात्री करण्यास सांगितले होते.
दरम्यान नितीन गडकरी यांनी सांगितले हे की 1 ऑक्टोबर 2022 पासून उत्पादित केलेल्या सर्व नवीन कारमध्ये स्टँडर्ड सुरक्षा म्हणून 6 एअरबॅग असणे अनिवार्य होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जानेवारी 2022 मध्ये मसुदा अधिसूचनेला मंजुरी दिली होती. अधिसूचनेनुसार, 8 प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या आणि 3.5 टन (म्हणजे M1 श्रेणीतील वाहने) पेक्षा कमी वजन असलेल्या सर्व कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य असतील. 1 जानेवारी 2022 पासून सर्व वाहनांमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी संलग्न असलेल्या संसद सदस्यांच्या सल्लागार समितीची पहिली बैठक 24 मार्च रोजी झाली. ही बैठक रस्ते सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
हा नियम लागू झाल्यानंतर रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट होऊ शकेल, असा सरकारचा विश्वास आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी वाहनात एअरबॅग असणे आवश्यक असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.