Nitin Gadkari On Road Accidents: दिल्लीतील रस्ता सुरक्षा जागरुकता मोहिमेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघाताबद्दल खंत व्यक्त केली. देशात दरवर्षी ५ लाख अपघात होतात, आणि १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो, असे गडकरी यांनी सांगितले.
अपघातामध्ये ६० टक्के प्रकरणांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील लोकांना आपला जीव गमवावा लागतो, ज्यामुळे आपल्या जीडीपीचे ३.१४ टक्के नुकसान होते आणि ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे," अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. Latest Marathi News
तसेच आज राज्यसभेत गुलाम अली यांनी आज रस्ते अपघातासंर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत ट्रक आणि वाहनांना महामार्गावरील अपघातांपासून वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. (Nitin Gadkari On Road Accidents)
अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न -
नितीन गडकरी म्हणाले की, डोंगराळ भागात अपघात होतात हेही खरे आहे. पूर्वी क्रॅश बॅरिअर्स लोखंडाचे असायचे. आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉंक्रिटमध्ये एम्बेड केले जाते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर पडण्याऐवजी मागे येतो.
या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोंगराळ भागात असे अपघात होतात. असे प्रयोग आम्ही काही ठिकाणी केल्याचे मंत्र्यांनी सांगितले. त्याचा वापर करून असे अपघात कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करत असल्याचे गडकरी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.