सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळ नागरिक हैराण आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होताना दिसते. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क कपात केल्यावर पेट्रोल सुमारे ९ रुपये प्रतिलिटरने स्वस्त झाले असले तरी नागरिकांना हैराण करणारे दर आहेत. दरम्यान, ही समस्या पाहता सरकारने आता पेट्रोल-डिझेलचा पर्याय शोधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन इंधनासह तुमची कार चालवण्यासाठी प्रति किमी फक्त 40 पैसे मोजावे लागणार आहेत.(Petrol diesel prize the car will run only at rs 8 per liter)
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही कार कंपन्यांशी पहिल्या फेरीबाबत चर्चा केली आहे. लवकरच देशात हायड्रोजनवर चालणाऱ्या कार बाजारात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नागरिकांना 8 रुपये प्रति लिटर इंधन मिळण्याची शक्यता आहे. स्वत: नितीन गडकरी यांनी हायड्रो पॉवर कारमधून संसदेत जात जनतेला संदेश दिला आहे.(Nitin Gadkari)
सरकारचं म्हणणं आहे की, हायड्रोजनवर चालणारी फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल शून्य कार्बन उत्सर्जनासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हे वाहन पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे ज्यामध्ये पाण्याशिवाय इतर कोणत्याही पदार्थाचे उत्सर्जन होत नाही. ग्रीन हायड्रोजन अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून तयार केला जाऊ शकतो.
नितीन गडकरी सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. अनेक निवडणूक सभांमध्ये त्यांनी हायड्रोजन इंधनाचा उल्लेख केला आहे. यासोबतच देशात लवकरच हायड्रोजनयुक्त वाहने येणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. या ग्रीन हायड्रोजन कारमुळे महागड्या पेट्रोल-डिझेलवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
यासोबतच, कार निर्मात्यांसोबत लवकरच अंतिम चर्चा केली जाईल. जेणेकरून ही वाहने लवकरच लोकांना उपलब्ध होऊ शकतील. असे गडकरींनी सांगितले.
ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?
ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा स्वच्छ स्रोत आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायझरचा वापर केला जातो. इलेक्ट्रोलायझर अक्षय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) वापरते. यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा (सोलार आणि विंड) या दोन्हींचा समावेश आहे. हायड्रोजनचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. यामध्ये रसायने (केमिकल), लोह, पोलाद, वाहतूक, हीटिंग आणि वीज यांचा समावेश आहे. हायड्रोजनच्या वापरामुळे प्रदूषणही पसरत नाही.
ग्रीन हायड्रोजन कसे काम करते?
हायड्रोजन कार थोड्या वेगळ्या असतात. अशा वाहनांमध्ये दोन हायड्रोजन टँक असतात, ज्यामध्ये एक हायली कंप्रेस्ड आणि दुसरा लो कम्प्रेस्ड असतो. हायड्रोजन वायू हा अतिशय ज्वलनशील आहे, त्यामुळे त्याची टाकी आणि तो वाहून नेणारा पाइप मजबूत असणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत, या प्रक्रियेत एका चेम्परचा वापर केला जातो. ज्यामध्ये एका बाजूने ऑक्सिजन आणि दुसऱ्या बाजूने हायड्रोजन पाठवला जातो. दोघांमधील रासायनिक अभिक्रियामुळे एक ऊर्जा निर्माण होते. जी कार चालण्यास मदत करते. यामध्ये धुराऐवजी H2O बाहेर पडतो. त्यामुळे प्रदूषणही पसरत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.