nitin gadkari said i first think about this serious issue in the evening is in which hotel and what to eat  Sakal
देश

Nitin Gadkari : संध्याकाळ झाली की नितीन गडकरींना पडतो 'हा' गहन प्रश्न; म्हणाले, मला...

सकाळ डिजिटल टीम

राजकीय क्षेत्रात नितीन गडकरी यांची वेगळी अशी ओळख आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी संध्याकाळ झाली की ते एका गंभीर प्रश्नाबद्दल विचार करायला लागतात असे, खुद्द गडकरी यांनीच सांगितले आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय वाचा..

भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी हे त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आवडींसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान त्यांनी शुक्रवारी (9 डिसेंबर) याबद्दल माहिती दिली आहे. गडकरी यांना जेवणाची खूप आवड आहे. याबद्दल बोलताना त्यांनी दररोज संध्याकाळी माझ्या मनात पहिला गंभीर विचार येतो तो म्हणजे काय खावे आणि कुठे खावे हाच अशी माहिती दिली. गडकरी पुढे म्हणाले की अन्न खाण्याच्या त्यांच्या इच्छेमध्ये कोणतीही घट झालेली नाही. मात्र, जेवणाचा डोस निश्चितपणे कमी झाला आहे.

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

'अजेंडा आज तक' या कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, "मला जेवणाची आवड आहे. संध्याकाळी सात नंतर मी विचार करतो ती पहिली गंभीर बाब म्हणजे जेवण. कोणत्या हॉटेलमध्ये खावे आणि काय खावे. गडकरी यांनी यावेळी आपण शाकाहारी असल्याचे देखील सांगितले. ते म्हणाले, खाण्याची इच्छा कमी झाली नाही, परंतु खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच यावेळी त्यांनी लोकांना त्यांच्या आरोग्याचा विचार करण्याचा सल्ला दिला.

इलॉन मस्कचे भारतात स्वागत़..

गडकरी म्हणाले की, टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांना भारतात उत्पादन करायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. ते म्हणाले, जर भारताऐवजी चीनमध्ये उत्पादन होत असेल तर त्यांना मार्केटिंगमध्ये सवलत मिळणार नाही. त्यांनी भारतातील कोणत्याही राज्यात उत्पादन केल्यास त्यांना फायदा होईल.

एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी टेस्ला बद्दल बोलताना म्हणाले की, जेव्हा ते मेक इन इंडिया बद्दल विचार करतील तेव्हा मस्क यांचे भारतात स्वागत असेल. ते म्हणाले की, भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सरकार देशात इलेक्ट्रिकल वाहनांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनकडून टेस्ला कार खरेदी करण्याऐवजी टेस्ला कारचे उत्पादन भारतातच केले पाहिजे. भारत ही मोठी बाजारपेठ असून टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी भारतात उत्पादन केल्यास त्याचा फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT