केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी एक मोठा खुलासा केला आहे. गडकरींनी सांगितलं की, त्यांना एका नेत्याने काँग्रेस पक्षात येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा त्या नेत्याला उत्तर देताना त्या पक्षाचा सदस्य होण्यापेक्षा मी विहीरीत उडी घेईल असं सांगितलं होतं.
रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री असलेल्या गडकरींनी यावेळी दावा केला की, काँग्रेसने ६० वर्षात केलेल्या कामांच्या दुप्पट कामे भाजप सरकारने मागील ९ वर्षात केली आहेत.
गडकरींनी भाजपमध्ये त्यांच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांनी त्यांना एकदा सल्ला दिलेल्या सल्ल्याची आठवण देखील गडकरींनी यावेळी सांगितली. शुक्रवारी भंडारा येथे झालेल्या सभेत गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले की जिचकर एकदा मला म्हणाले की, तुम्ही पक्षाचे चांगले कार्यकर्ता आणि नेते आहात. जर तुम्ही काँग्रेसमध्ये सामील झालात तर तुमचं भविष्य उज्वल असेल. मात्र नितीन गडकरी यांनी त्यांना मी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याएवजी विहीरत उडी घेईल, कारण माझा भाजप पक्ष आणि त्यांची विचारधारा यावर पक्का विश्वास आहे आणि मी त्यासाठी काम करत राहील.
गडकरींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करताना तरुणपणीच त्यांना नितीमुल्य शिकवल्याबद्दल संघाची स्तुती देखील केली. काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष तयार झाल्यानंतर अनेक वेळा फुटला आहे. आपण देशाचा इतिहास विसरता कामा नये.
आपण चांगल्या भविष्यासाठी इतिहासाकडून धडा घेतला फाहिजे. आपल्या ६० वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने गरीबी हटाओ चा नारा दिला होता, मात्र वयक्तिक लाभासाठी त्यांनी अनेक एज्युकेशन इंस्टीट्यूट उघडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.