Nitish Kumar trusted leader-Important role in alliance with BJP-Who is Sanjay Jha-bihar marathi news 
देश

Nitish Kumar: नितीश कुमार यांचे 'संकटमोचक', आधी RJD सोबत सरकार आता NDA आघाडीचे कर्णधार...

Nitish Kumar: बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार यांनी आज (रविवार) राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार 9 व्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याशिवाय सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.

Sandip Kapde

Nitish Kumar:

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार यांनी आज (रविवार) राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार 9 व्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याशिवाय सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.

नितीश यांनी रविवारी सकाळी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. जेडीयू व्यतिरिक्त, यापूर्वीच्या महाआघाडी सरकारमध्ये आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष होते. आता पुन्हा एकदा जेडीयूने भाजप आणि इतर एनडीए पक्षांसोबत सरकार स्थापन केले आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.

नितीश कुमार हे पलटी राजकारणात मुरलेले राजकारणी आहे. कोणत्याही पक्षासोबत युती करताना ते ऑपशन बी देखील तयार ठेवतात. यामध्ये राजकीय चर्चा, पलटी मारण्याची प्रक्रिया, बैठका अशा अनेक गोष्टी असतात. यासाठी नितीश कुमार यांच्यासाठी एकजण दुत म्हणून काम करतात. 17 महिन्यांच्या विभक्त झाल्यानंतर, भाजपसोबतची मैत्री पुन्हा रुळावर आणण्यात आणि राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यात या दूताची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.आश्चर्यकारक बाब म्हणजे याच दूताने 17 महिन्यांपूर्वी राजद सोबत युती करण्यातही मोठी भूमिका बजावली होती. (nitish kumar News in Marathi)

संजय झा असे नितीश कुमार यांच्या दुताचे नाव आहे. जे नितीश कुमार सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. नव्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्री केले जाईल, अशी चर्चा आहे. आज जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राजदसोबतची युती तोडून भाजपसोबत नवे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा तेच संजय झा पाटणा येथील वीरचंद पटेल येथे भाजपच्या मुख्यालयात पोहोचले होते. नितीश कुमार यांना भाजपच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन परत आले.

संजय झा हे आमदार आहेत. तसेच ते पक्षाचे सरचिटणीस देखील आहेत. मागील सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्री व जनसंपर्क मंत्री होते. संजय झा हे नितीश कुमार यांच्या अगदी जवळचे मानले जातात. त्यांनी जेएनयूमध्ये एमए केले आहे. नितीश कुमार मंत्रिमंडळात तीन वेळा मंत्री राहिले आहेत. आता ते चौथ्यांदा मंत्री होण्याच्या मार्गावर आहेत. (Latest Marathi News)

संजय झा व्यतिरिक्त नितीश कुमार यांच्याकडे इतर दुत असल्याचे चर्चा आहे. यामध्ये राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे नाव आहे. ते भाजप आणि जेडीयूमधील संबंधांमधील दुवा असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT