भारत सरकारनं पाकिस्तानातील हिंदूंसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय.
NMC Scheme For Pakistani Hindu : भारत सरकारनं पाकिस्तानातील (Pakistan) हिंदूंसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्रानं घेतलेल्या या निर्णयामुळं भारतानं पाकिस्तानी हिंदू डॉक्टरांसाठी (Hindu Doctor) आपले दरवाजे उघडलेत. पाकिस्तानमध्ये छळ करण्यात आलेल्या हिंदू आणि शिखांसह इतर अल्पसंख्याक डॉक्टरांना भारतात प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
नॅशनल मेडिकल कमिशननं (National Medical Commission, NMC) त्यांना भारतात डॉक्टर म्हणून काम करण्याची दारे खुली केली आहेत. 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान सोडून हिंदुस्थानात आलेल्या पाकिस्तानी अल्पसंख्याकांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी आता नॅशनल मेडिकल कमिशननं आधुनिक वैद्यकशास्त्र किंवा अॅलोपॅथीचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी भारतीय नागरिकत्व घेतलेल्या लोकांकडून अर्ज मागवले आहेत.
NMC च्या अंडरग्रॅजुएट मेडिकल एज्युकेशन बोर्डानं (UMEB) शुक्रवारी जारी केलेल्या सूचनेनुसार, निवडलेल्या अर्जदारांना आयोग किंवा त्याद्वारे अधिकृत एजन्सीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल. प्रस्तावित चाचणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी जूनमध्ये तज्ज्ञांचा एक गट स्थापन केला होता. पाकिस्तानमधील छळ झालेल्या अल्पसंख्याकांमध्ये वैद्यकीय पदवीधरांना सक्षम करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आलाय. त्यानंतर त्यांना भारतात सराव करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी करता येणार आहे.
UMEB च्या नियमांनुसार, अर्जदाराची वैध वैद्यकीय पात्रता असणं आवश्यक आहे. भारतात स्थलांतरित होण्यापूर्वी त्यानं पाकिस्तानमध्ये सराव केलेला असावा. 5 सप्टेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. अर्जदारांनी NMC वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.