indigo esakal
देश

VIDEO: AC बंद तरी IndiGo चे टेकऑफ, घाम पुसण्यासाठी दिले टिशू पेपर

सकाळ डिजिटल टीम

No AC on IndiGo flight

नवी दिल्ली- पंजाब काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा यांनी इंडिगो विमान प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी दावा केलाय की, चंदीगड ते जयपूर 90 मिनिटांच्या प्रवासादरम्यान विमानामध्ये एसी काम करत नव्हती. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर त्यांना घाम पुसण्यासाठी टिशू पेपर देण्यात आले. अमरिंदर सिंह इंडिओ 6E7261 मध्ये प्रवास करत होते. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रवाशी मॅगझिन किंवा रुमालाच्या सहाय्याने स्वत:ला हवा मारत असल्याचं दिसतंय.

अमरिंदर सिंह राजा यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, कडक उन्हात 10 ते 15 मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर आम्ही विमानात प्रवेश केला तर कळालं की विमानातील एसी बंद आहे. त्यामुळे माझ्यासह सर्वांना त्रास सहन करावा लागला. टेकऑफ ते लँडिंगपर्यंत एसी बंद होता त्यामुळे मनस्ताप झाला. ज्यांनी तक्रार केली त्यांना टिशू पेपर देण्यात आले. अनेकांनी याला गांभीऱ्याने घेतले नाही.

अमरिंदर सिंह राजा म्हणाले की, एअरहॉस्टेसने उपकार करत सर्वांना टिशू पेपर वाटले. विमानात अनेक महिला आणि लहान मुलं होती. त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. नाईलाजाने सर्वांना हातानेच पंखा मारावा लागला. विमानाची एसी बंदी होती तर त्याचे काम का करुन घेतले नाही. विमान तसेच पाठवण्यात आले. यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. त्यामुळे ते लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यांनी डीजीसीएकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केलीये. जेणेकरुन इतर कुणाला अशाप्रकारचा त्रास सहन कराला लागू नये.

एका दिवसात इंडिगोचा ही तिसरा मोठा यांत्रीकी दोष आहे. पाटणा ते दिल्ली जाणाऱ्या विमानाला पाटणा विमानतळावरच आपातकालीन लँडिंग करावी लागली होती. इंजिनमध्ये दोष निर्माण झाल्याने असं करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दुसरीकडे रांची ते दिल्ली जाणारे इंडिगो विमान एका तासाने परत रांची येथे उतरवण्यात आले होते. यामध्येही काही दोष निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT