no confidence motion why rahul gandhi not spoken first lok sabha parliament monsoon session 2023  eSakal
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावर काल का बोलले नाहीत? अशी होती काँग्रेसची स्ट्रॅटजी

रोहित कणसे

New Delhi News : लोकसभेत मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. याचर्चेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज भाग घेतला. राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

चर्चेच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी हे चर्चेला सुरुवात करतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांच्या ऐवजी गौरव गोगोई बोलायला उभे राहिले. यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राहुल गांधींनी बोलावं अशी मागणी देखील केली. आम्हाला राहुल गांधींचे ऐकायचे होते.

पण पहिल्या दिवशी राहुल गांधी सभागृहात का बोलले नाहीत? राहुल गांधी पहिल्या दिवशीच्या चर्चेत गौरव गोगोई यांचे म्हणणे अतिशय लक्षपूर्वक ऐकत राहिले. पण स्वतः बोलले नाहीत. तर यामागे मोठे कारण आहे. या वेळी संसदेच्या संपूर्ण अधिवेशनात विरोधीपक्षाच्या आघाडीने मणिपूरवर चर्चेची मागणी लावून धरली आहे.

तसेच काँग्रेसला अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने सभागृहात बोलण्याची संधी देखील मिळाली आहे, त्यामुळे त्यांचा पक्ष नॉर्थ इस्टला किती महत्त्व देतो हे सर्व देशाला दाखवून देण्याची ही मोठी संधी होती. जर राहुल गांधी पहिल्याच दिवशी बोलले असते तर कदाचित मणिपूरच्या मुद्द्यावर एवढा प्रभाव पडला नसता. त्याएवजी आसामचे खासदार असलेल्या गौरव गोगोई यांच्या माध्यमातून मणिपूरच्या मुद्द्यावर काँग्रेस किती गंभीर आहे हाच संदेश देण्यात आला. हीच गोष्ट गौरव गोगोई यांच्या बोलण्यातूनही दिसून आली.

आम्ही हा अविश्वास प्रस्ताव मणिपूरसाठी आणल्याचे काँग्रेस खासदार म्हणाले. मणिपूर न्यायाची मागणी करत आहे. मणिपूरच्या मुली आणि शेतकरी, विद्यार्थी न्याय मागत आहे. मार्टिन ल्यूथर किंग यांनी म्हटले आहे की, कुठेही अन्याय झाला तर तो सगळीकडच्या न्यायासाठी धोका बनू शकतो. मणिपूर जळत असेल तर भारत जळत आहे. मणिपूरची फाळणी झाली तर भारताची फाळणी होईल. आपण केवळ मणिपूरबद्दल बोलत नाही, तर संपूर्ण भारताबद्दल बोलत आहोत.

यावर पंतप्रधानांनी बोलावे एवढीच आमची मागणी होती. मात्र पंतप्रधानांनी सभागृहात काहीही बोलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळेच अविश्वास ठराव आला आहे. याद्वारे आम्हाला पीएम मोदींचे मौन सोडायचे आहे. त्यांच्यासठी तीन प्रश्न आहेत. पहिला- ते आजपर्यंत मणिपूरला का गेला नाही? प्रश्न दोन- मणिपूरवर बोलण्यासाठी पंतप्रधानांना ८० दिवस का लागले? तेही फक्त तीस सेकंद? प्रश्न तिसरा- पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही? असे गोगोई म्हणाले होते.

राहुल गांधी काय म्हणाले?

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी बहाल झाली. यानंतर राहुल गांधी आज (९ ऑगस्ट) पहिल्यांदा लोकसभेत भाषण केलं. यावेळी राहुल गांधी यांनी मणिपूर मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलं.

राहुल गांधी म्हणाले की, "तर काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले नाहीत. कारण मोदींसाठी मणिपूर देश नाही. मणिपूरला यांनी तोडले आहे. दोन भाग केले आहेत. मणिपूरमध्ये मी रिलीफ कॅम्पमध्ये महिलांसोबत संवाद साधला. मी त्यांना विचारले ताई काय झाले? त्या म्हणाल्या, माझा लहान मुलगा होता. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी मारली. मी पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहासोबत होती. त्यानंतर मला भिती वाटली मी माझे घर सोडले. फक्त मी माझे कपडे आणले. यावेळी तिने मुलाचा फोटो दाखवला. मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली. तुम्ही भारत मातेच्या रखवाले नाही तर हत्यारे आहात."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिरात तूप पुरवणाऱ्या एआर डेअरीचा मालक कोण? काय करते कंपनी?

Actor Accident: 'माय नेम इज खान' फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; आयसीयूमध्ये आहे परवीन डबास, प्रकृती गंभीर

Marathi New Movie : हिटलरच्या भूमिकेसाठी इतके अर्जदार ! ही आहे परेश मोकाशींच्या मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीची भन्नाट कास्ट

Latest Marathi News Updates : आरळा-बेरडेवाडी-कोकणेवाडी रस्त्यासाठी पावणेसहा कोटी मंजूर- धैर्यशील माने

VBA First List: वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

SCROLL FOR NEXT