‘No Means No’, पिंक चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा कोर्टातील हा डायलॉग चर्चेत होता. याच डायलॉगचा उल्लेख सोमवारी दिल्ली हायकोर्टात एका वकिलाने केला.
‘No Means No’, पिंक चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा कोर्टातील हा डायलॉग चर्चेत होता. याच डायलॉगचा उल्लेख सोमवारी दिल्ली हायकोर्टात एका वकिलाने केला. महिलेने १० वेळा तिच्या संमतीने प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवले. मात्र, अकराव्यांदा तिने शरीरसंबंधास नकार दिला असेल तर तो बलात्कारच आहे. No Means No, असा दावा वकिलांनी युक्तिवादादरम्यान केला.
काय आहे प्रकरण?
दिल्ली हायकोर्टात सोमवारी न्या. रजनीश भटनागर यांच्यासमोर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामीनअर्जाबाबत सुनावणी झाली. पीडित महिला आणि आरोपी दोघेही विवाहित आहेत. पीडितेने आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेचा पती कतार येथे राहत असून दाम्पत्याला तीन लहान मुले आहेत. आरोपीच्या पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडले होते. बार अँड बेंच या वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.
हायकोर्टात नेमके काय घडले?
पीडितेच्या वतीने वकील अनू नरुला यांनी हायकोर्टात बाजू मांडली. आरोपीच्या जामीन अर्जाला नरुला यांनी विरोध दर्शवला. युक्तिवादादरम्यान नरुला म्हणाले, ‘ आरोपीसोबत तीन वेळा रिलेशनशिपमध्ये होते, असे पीडितेने म्हटले आहे. जर पीडितेला खोटे आरोप करायचे होते, तर तिने संबंधांची कबुली दिली नसती. महिलेने तिच्या संमतीने आरोपीशी १० वेळा शरीरसंबंध ठेवले. मात्र, अकराव्यांदा तिने शरीरसंबंधास नकार दिला असेल तर तो बलात्कार ठरतो. No Means No.’ ‘मी बॉलिवूड चित्रपटांचा चाहता आहे. सर्वांनी पिंक चित्रपट आवर्जून पाहावा’ असेही नरुला यांनी सांगितले.
‘पिंक चित्रपटात मुली मद्यपान करतात, मित्रांसोबत पार्टी करतात. हे प्रकरण आणि पिंक चित्रपटाची कथा याची तुलना करता येणार नाही. मात्र या प्रकरणात महिलेचे प्रेमसंबंध होते आणि तिला ते सर्वांसमोर उघड करायचे नव्हते’, असेही वकिलांनी सांगितले. पीडिता गरोदर होती आणि आरोपीने तिला गर्भपातास भाग पाडले, असा दावाही नरुला यांनी कोर्टात केला.
हायकोर्टाने काय म्हटले?
युक्तिवादानंतर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. आरोपी आणि पीडित महिला यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपीने लग्नास नकार दिल्याने वाद निर्माण झाला. या प्रकरणातील आरोपी आणि पीडित महिला दोघेही विवाहित आहेत. त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. पीडिता गरोदर होती, तर तिने त्यावेळीच पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे. पण इतक्या वर्षांनी ती तक्रार दाखल करतेय, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवले. हायकोर्टाने शेवटी याप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.