भूज : भारतात हिंदू राष्ट्र स्थापनेची गरज नाही, कारण भारत सध्या हिंदू राष्ट्रच आहे, असं विधान रा. स्व. संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबाळे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळं पुन्हा एकदा हिंदूराष्ट्र हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील भूज इथं रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दे बोलत होते. (no need to establish Hindu Rashtra in India because it is already there RSS Dattatray Hosbale clear organisational stand)
होसबाळे म्हणाले, "भारत हिंदूराष्ट्र पहिल्यापासून होता अजूनही आहे आणि यापुढेही राहिल. डॉ. हेडगेवार यांनी म्हटलं होतं की, "मी हिंदू आहे असं मानणारा एकही माणूस जोपर्यंत या भारत भूमीवर राहिल तोपर्यंत हे राष्ट्र हिंदूराष्ट्र असेल. त्यामुळं हे हिंदूराष्ट्र आहेच, नाही असा विषय नाही. (Latest Marathi News)
उलट संविधानात जी राज्यपद्धती आहे, म्हणजेच स्टेट ही संकल्पना आहे ती राष्ट्र या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. राष्ट्राच्या नात्यानं हा देश हिंदू आहे. यापूर्वी इंग्रज याठिकाणी राज्य करत होते, त्यावेळी ब्रिटिशराज होतं, पण तेव्हाही हे राष्ट्र हिंदूराष्ट्रच होतं, असंही होसबाळे यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ या काळात संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक घरोघरी-गावोगावी जातील आणि लोकांना राम मंदिराचं एक चित्र भेट देतील तसेच सर्वांना मंदिर आणि रामलल्लाच्या दर्शनासाठी येण्याचं निमंत्रण देतील. या दृष्टीनं लाखोंच्या संख्येनं व्यापक जनसंपर्क करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.