Supertech Emerald Court Twin Towers esakal
देश

ट्वीन टॉवर जमीनदोस्त; पाहा कुणावर काय परिणाम?

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : नोएडा येथील ट्वीन टॉवर आज जमीन दोस्त करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकाम केल्यामुळे सरकारच्या आदेशानंतर हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. यासाठी अनेक लोकांच्या रेस्क्यू टीमने काम केले आहे. ही टोलेजंग इमारत पाडण्यासाठी तब्बल दिवसभर स्फोटके लावण्याचे काम चालू होते. तर यामुळे द्रुतगती महामार्ग अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

(Twin Tower Demolition Updates)

नोएडा येथे असलेले ट्वीन टॉवर हे अनाधिकृत असल्याने हा वाद अलाहाबाद कोर्टाकडून सुप्रीम कोर्टाकडे गेला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे टॉवर पाडण्याचे आदेश दिल्यामुळे हे टॉवर अखेरी आज पाडण्यात आले. यामध्ये अनेक लोकांचे नुकसान झाले असून अनेकांच्या जीवनावर बदल झाला आहे.

टॉवर पाडल्याने आसपासच्या लोकांना काय परिणाम?

  • हे टॉवर पाडण्यासाठी तेथील तब्बल पाच हजार लोकांना हलवण्यात आले आहे.

  • टॉवर पाडल्यामुळे लोकांना धुळीच्या लोटामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात.

  • आसपासच्या सोसायटीमध्ये धुळीच्या लोटामुळे धूळ जमा होण्याची शक्यता

  • हे टॉवर पाडण्यासाठी अर्ध्या तासासाठी एक्सप्रेस वे बंद

यामुळे कुणाचे किती नुकसान?

  • हे टॉवर उभारण्यासाठी जवळपास १७०० कोटी रूपये खर्च आल्याची माहिती आहे.

  • ट्वीन टॉवर पाडण्यासाठी जवळपास २७ कोटी रूपये खर्च आल्याची माहिती.

  • या प्रकल्पात गुंतवणुक केलेल्यांचे आर्थिक नुकसान होणार

अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने (RWA) २०१२ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बांधकाम अनधिकृत ठरवून २०१४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. या निकालाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. इमारतीचे नियम आणि अग्निसुरक्षा धाब्यावर बसवून हे टॉवर्स बांधण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Haryana Assembly Election Result: भाजपच्या विजयामागे EVM बॅटरीचा काय संबंध? ''99 टक्के चार्जिंग असेल तर भाजपचा विजय'' काँग्रेसचे आरोप

Pune News : जिल्ह्यातील सव्वातीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी रुपये अनुदान वर्ग

Pune News : शरद पवार यांची बोपदेव घाटात घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT