Swami Prasad Maurya 
देश

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे अध्यक्ष स्वामी प्रसाद मौर्य यांनी लोकसभेसाठी कुशीनगरमधून उमेदवारी अर्ज भरला होता.

कार्तिक पुजारी

लखनऊ- उत्तर प्रदेशातील कुशीनगर लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, या लोकसभा मतदारसंघातून वडील आणि मुलगा या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे अध्यक्ष स्वामी प्रसाद मौर्य यांनी लोकसभेसाठी कुशीनगरमधून उमेदवारी अर्ज भरला होता. त्याच वेळी त्यांचे पुत्र उत्कृष्ट मोर्य यांनी देखील या जागेवरुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

पिता-पुत्रांनी एकाच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या उत्कृष्ट मौर्य यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. पिता-पुत्रामध्ये लोकसभेच्या जागेसाठी लढत होणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता दोघांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला? याचे कारण समोर आले आहे. असं कळतंय की, स्वामी प्रसाद मौर्य सुरक्षित रणनीती आखत आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला तर ते आपला मुलगा उत्कृष्ट मौर्य यांच्या बाजूनं मैदानात उतरतील. असं सांगितलं जातंय की, स्वामी प्रसाद मौर्य कुशीनगरमधून निवडणूक लढणार नाहीत. ते आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेऊ शकतात.

कुशीनगर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, भाजपचे विजय कुमार दुबे, अपना दल यूनायटेडचे अमिरुद्दीन, राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य, सपाचे अजय प्रताप सिंह, भारतीय लोकनायक पार्टीचे सुनील कुमार शुक्ल, आझाद अधिकार सेनाचे हरिकेश, भागीदारी पार्टीचे श्याम बिहारी, भारतीय शक्ती चेनता पक्षाचे उमेश सिंह, सुभावती भासपचे वेद प्रकाश मित्र हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

नव्या पक्षाची केली होती स्थापना

स्वामी प्रसाद मौर्य यांनी 'सपा'तून वेगळं होऊन फेब्रुवारी महिन्यात नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. ते स्वत: कुशीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांचा मुलगा देखील कुशीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात आहे. माहितीनुसार, स्वामी प्रसाद मौर्य आपले पुत्र उत्कृष्ट यांना राजकारणात स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT