Mamata Banerjee sakal
देश

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडून दखल;अहवाल सादर करण्याच्या सरकारला सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथील एका दाम्पत्याला झालेल्या मारहाण प्रकरणी पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही पश्‍चिम बंगाल सरकारला आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांना या प्रकरणी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक तपास पथक स्थापन करून घटनास्थळी पाठवावे आणि वस्तुस्थतीदर्शक अहवाल आयोगाला सादर करावा, असे निर्देशही आयोगाने महासंचालकांना दिले आहेत.

तृणमूल नेत्यावर गुन्हा दाखल

पश्‍चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथील एका दाम्पत्याला झालेल्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेला तृणमूल काँग्रेसचा नेता ताजेमुल इस्लाम याच्यावर, हत्येचा प्रयत्न करणे, विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. ताजेमुल याला उत्तर दिनाजपूर येथील न्यायालयाने सोमवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT