NSE Co-Location Case esakal
देश

आनंद सुब्रमण्यम यांना मोठा धक्का; न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला

सकाळ डिजिटल टीम

आनंद यांनी चित्रा रामकृष्ण यांना NSE घोटाळ्यात मदत केली होती.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (National Stock Exchange,NSE) माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांचे माजी सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं गुरुवारी फेटाळला.

NSE को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी (NSE Co-Location Case) CBI नं गेल्या महिन्यात चेन्नईतून आनंद सुब्रमण्यम (Anand Subramaniam) यांना अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणात आनंद यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी चित्रा रामकृष्ण यांना घोटाळ्यात मदत केली होती. तर, दुसरीकडं चित्रा रामकृष्ण यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. चित्रा यांच्यावर स्टॉक एक्सचेंजची अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती आनंद यांना दिल्याचा आरोप आहे.

मार्केट रेग्युलेटरनं (SEBI) चित्रा रामकृष्ण यांच्यावर हिमालयातील एका अज्ञात बाबाच्या सांगण्यावरून निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही, तर बाबाच्या सल्ल्यानंच त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांची ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल; बापूसाहेब पठारेंचा हल्लाबोल

Champions Trophy 2025: भारताचा ICC ने गेम केला ना भाऊ...! पाकिस्तानच असणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान, BCCI काय करणार?

Latest Maharashtra News Updates : इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी

"मालिकेची अजूनही असलेली लोकप्रियता आणि थ्री इडियटचं ऑडिशन"; नव्वदीमधील लाडका 'गोट्या' आता काय करतो घ्या जाणून

सुरज आता तो सुरज राहिला नाही... बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव, म्हणाली- त्याचं वागणं पाहून...

SCROLL FOR NEXT