नवी दिल्ली : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI) नॅशनल स्टॉक एक्स्चेंजबाबत (NSE) एक धक्कादायक खुलासा केला आहे. सेबीच्या अहवालानुसार, NSE मध्ये आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती एका 'योगी' अर्थात अध्यात्मिक गुरुच्या सांगण्यावरुन झाली होती. सुब्रमण्यम यांना शेअर बाजाराचा कुठलाही अनुभव नसताना त्यांचा वार्षिक पगार १५ लाखांवरुन ४ कोटी रुपयांहून अधिक करण्यात आला होता. सेबीच्या या खुलाशानंतर या अध्यात्मिक गुरुबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत. (NSE stock market operated for three years on orders of spiritual leader)
सेबीनं खुलासा करताना असंही म्हटलंय की, याच गुरुच्या सांगण्यावरुन NSEचे माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण प्रत्येक निर्णय घेत होत्या. विशेष म्हणजे या गुरुला चित्रा यांनी स्वतः काधीही पाहिलेलं नाही. चित्रा रामकृष्ण या तीन वर्षे राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजच्या एमडी राहिल्या आणि त्याच योगीच्या सांगण्यावरुन त्या सर्व निर्णय घेत होत्या.
हिमालयात राहतो अध्यात्मिक गुरु
सेबीच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, NSEच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयात राहणाऱ्या योगी पुरुषाचा प्रभाव होता. या योगीच्या सांगण्यावरुनच त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांना एनएसईत समूह ऑपरेशनल अधिकारी आणि एमडीच्या सल्लागारपदी नियुक्ती केली होती. चित्रा रामकृष्ण या सन २०१३ पासून डिसेंबर २०१६ पर्यंत एनएसईच्या एमडी आणि सीईओ होत्या. अज्ञात अध्यात्मिक गुरुला त्या शिरोमणी असं संबोधत होत्या. ही व्यक्ती म्हणजे एक अध्यात्मिक व्यक्ती असून गेल्या २० वर्षांपासून त्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक गोष्टींवर त्यांचं मार्गदर्शन करत आहेत.
योगी परमहंस यांच्या २० वर्षांपासून होत्या संपर्कात
सेबीनं १९० पानी अहवालात २३८ वेळा 'अज्ञात व्यक्ती' असा उल्लेख केला आहे. चित्रा रामकृष्ण या या व्यक्तीला शिरोमणी असं संबोधत होत्या. २०१८ मध्ये सेबीला दिलेल्या जबाबात चित्रा यांनी सांगितलं होतं की, योगी परमहंस नामक व्यक्तीशी त्या संवाद साधत होत्या, जो हिमालयात असतो. वीस वर्षांपासून त्या परमहंस यांच्या संपर्कात होत्या. तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होत्या.
अशी झाली होती कारवाई
सेबीने रामकृष्ण आणि सुब्रमण्यन यांच्यासह एनएसई आणि त्याचे माजी एमडी तसेच मुख्य कार्यपाल अधिकारी रवि नारायण तसेच इतरांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियामक बोर्डानं रामकृष्ण यांच्यावर तीन कोटी रुपये, एनएसई, नारायण आणि सुब्रमण्यन यांच्यावर प्रत्येकी दोन कोटी रुपये तसेच व्ही. आर. नरसिम्हन यांच्यावर सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.