NSG Commando Training on milatry camp 
देश

NSG कडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी, IAF बेसवर कमांडोज तैनात

ड्रोन हल्ल्यापासून (drone attack) संरक्षण देण्यासाठी या कमांडोजची तैनाती झाली आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: श्रीनगर आणि जम्मूमधल्या इंडियन एअर फोर्सच्या (indian air force) तळांवर NSG कमांडोज तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन हल्ल्यापासून (drone attack) संरक्षण देण्यासाठी या कमांडोजची तैनाती झाली आहे. एनएसजीचे डायरेक्टर जनरल एम.ए.गणपती यांनी शनिवारी ही माहिती दिली. २७ जूनला पहिल्यांदा जम्मूमधल्या इंडियन एअर फोर्सच्या बेसवर ड्रोन हल्ला झाला होता. सीमेपलीकडून आलेल्या ड्रोनमधून बॉम्बफेक (bomb attack) झाली होती. यात एअर फोर्सचे दोन जवान जखमी झाले होते. इमारतीच्या काही भागांचे नुकसान झाले होते.

जम्मू-काश्मीरधील आयएएफचे हे दोन्ही बेस पाकिस्तान सीमेजवळ आहेत. संवेदनशील स्थळांमध्ये हे दोन्ही तळ मोडतात. हायजॅकचे प्रयत्न हाणून पाडण्यात हे NSG कमांडोज माहीर आहेत. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्यावेळी याच एनएसजी कमांडोजना पाचारण करण्यात आले होते. ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण करण्याची एनएसजीकडे व्युहरचना आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

ड्रोन विरोधी साहित्य, रडार, जॅमर्स आणि ड्रोन पाडणाऱ्या बंदुकांनी एनएसजी सुसज्ज आहे. जम्मूमधल्या आयएएफ बेसवर हल्ला झाल्यानंतर एनएसजीची टेक्निकल टीम तिथे गेली होती. तिथे त्यांनी आपली सिस्टिम फिट केली आहे.

"ड्रोन हल्ला हे नवीन आव्हान आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षादलांना आपली क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. शस्त्रास्त्र टाकण्यापासून ते बॉम्बहल्ला ड्रोनच्या सहाय्याने सहजतेने करता येऊ शकतो" असे डी.जी. गपणती यांनी माडियाशी बोलताना सांगितले. ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्याच्या ऑपरेशनमध्ये एनएसजी कमांडोज पारंगत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT