नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, अंडरग्रेजुएट (NEET UG) 2024 पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
NTA द्वारे 1563 उमेदवारांसाठी पुनर्परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु पुनर्परीक्षेत केवळ 813 उमेदवार उपस्थित राहिले होते.
ही पुनर्परीक्षा 1563 उमेदवारांसाठी घेण्यात आली होती. या पुनर्परीक्षेत सहभागी झालेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर जाऊन त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
NEET UG 2024 चे समुपदेशन 6 जुलैपासून सुरू होणार आहे. पात्र उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
आकडेवारीनुसार, 5 मे रोजी झालेल्या NEET UG 2024 परीक्षेत 9,96,393 पुरुष उमेदवार, 13,31,321 महिला उमेदवार आणि 17 ट्रान्सजेंडर उमेदवारांनी सहभाग घेतला होता, ज्यांची एकूण उपस्थिती 96.94 टक्के होती.
NEET-UG म्हणजेच राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-अंडर ग्रॅज्युएट. दरवर्षी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेते.
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, भारत आणि परदेशातील वैद्यकीय संबंधित अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
भारतातील 542 वैद्यकीय, 313 दंत, 914 आयुष आणि 47 BVSc आणि AH महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी NEET-UG आयोजित केले जाते.
NTA ने 4 जून रोजी NEET-UG 2024 चा निकाल जाहीर केला तेव्हा याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. कारण या परीक्षेत एकूण 67 उमेदवारांनी 720 पैकी 720 गुण मिळवले होते आणि सर्वांना टॉपर घोषित करण्यात आले होते.
एकाच वेळी 67 उमेदवार टॉपर्स ठरल्यानंतर परीक्षेवर प्रश्न उपस्थित केले गेले कारण 2019 पासून, NEET UG च्या परीक्षेत तीनपेक्षा जास्त टॉपर्स झालेले नव्हते. यात विशेष बाब म्हणजे या 67 टॉपर्सपैकी 44 ग्रेस मार्क्ससह टॉपर ठरले. तर 8 टॉपर्स एकाच परीक्षा केंद्रावरील होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.