bjp leading in odisha esakal
देश

Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

अंकिता खाणे (Ankita Khane)

ओडिशाच्या 145 जागांवर कल दिसून आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय जनता पार्टी 78 जागांवर आघाडीवर आहे आणि ट्रेंडमध्ये आवश्यक आकडा पार केला आहे. त्याचवेळी बीजेडी 49 जागांवर तर काँग्रेस 14 जागांवर पुढे आहे. आतापर्यंत केवळ 4 जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी 74 जागांची आवश्यकता आहे.

ओडीशामध्ये भाजपने ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. नवीन पटनायक यांच्या २६ वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. ओडिशामध्ये केवळ बीजेडीला ५१ जागांवर आघाडी मिळाली आहे.

ओडिशामध्ये केवळ बीजेडीला ५१ जागांवर आघाडी मिळाली आहे. सर्व प्रमुख एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. ओडिशातील विधानसभा जागांवरही भाजपला फायदा होताना दिसत आहे. एक्झिट पोलचे अंदाज निकालात बदलले असल्याचे दिसून येत आहे.

नवीन पटनायक 2024 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीकडून निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर कोणत्याही प्रादेशिक चेहऱ्याशिवाय ही निवडणूक लढवली. ओडिशा विधानसभेच्या 147 जागांसाठी आणि लोकसभेच्या 21 जागांसाठी 13 मे ते 1 जून या चार टप्प्यांत मतदान झाले आणि आज निकाल जाहीर होणार आहेत.

नवीन पटनायक 2024 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीकडून निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर कोणत्याही प्रादेशिक चेहऱ्याशिवाय ही निवडणूक लढवली. ओडिशा विधानसभेच्या 147 जागांसाठी आणि लोकसभेच्या 21 जागांसाठी 13 मे ते 1 जून या चार टप्प्यांत मतदान झाले आणि आज निकाल जाहीर झाला आहे. ओडिशात लोकसभा आणि विधानसभेत भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किंग कोहलीला भेटण्याची ओढ! Virat Kohli साठी १५ वर्षीय मुलाचा तब्बल ७ तास सायकल प्रवास

Solapur Crime: राष्ट्रीय खेळाडूने नदीपात्रात उडी घेत जीव दिला; नेमकं काय घडलं?

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... बैठकीनंतर BCCI करणार मोठी घोषणा?

Nicholas Pooran ने मोडला पाकिस्तानच्या रिझवानचा मोठा विक्रम! २०२४ वर्षात ठरला नंबर वन

Latest Maharashtra News Live Updates : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 66 लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT