naveen patnaik sakal
देश

Odisha Election 2024 Result : ओडिशात प्रथमच ‘कमळ’ फुलले

पंचवीस वर्षांनंतर नवीनबाबू होणार पायउतार

पीटीआय

भुवनेश्‍वर - ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने इतिहास घडविला. मागील २५ वर्षांपासून एकतर्फी सत्ता गाजविलेल्या बिजू जनता दलाला धोबीपछाड देत भाजपने राज्यातील १४७ जागांपैकी ८० जागांवर विजय मिळवत बहुमताला गवसणी घातली. त्यामुळे ओडिशामध्ये प्रथमच भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील ‘बीजेडी’ला ५९ जागांवर विजय मिळाला.

लोकसभेबरोबरच ओडिशामध्ये विधानसभेसाठीही मतदान झाले होते. लोकसभेसाठी आघाडी होऊ न शकलेल्या ‘बीजेडी’ला सत्तेतून बाहेर फेकण्याच्या उद्देशानेच भाजपने राज्यात जोरदार प्रचार केला होता. मात्र, ‘सरकारी बाबूंकडून सरकार चालविले जात असल्याचा’ भाजपने केलेला प्रचार प्रभावी ठरला आणि मतदारांनी प्रथमच भाजपच्या उमेदवारांना मतांचे दान दिले.

राज्यात बहुमतासाठी ७४ जागांवर विजय आवश्‍यक असताना भाजपला ८० जागा मिळाल्या आहेत. जागांचे अर्धशतक कसेबसे पूर्ण केलेल्या ‘बीजेडी’ला आता प्रथमच विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

भाजपची वाढती ताकद

बिजू जनता दलाची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांतच नवीन पटनाईक हे सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सातत्याने त्यांचाच पक्ष सत्तेत विजयी होत असून नवीन पटनाईक हेच सलग पाच वेळा मुख्यमंत्रिपदावर आहेत. ‘बीजेडी’च्या आधी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. नंतर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेला.

मात्र, २०१४ पासून राज्यातील भाजपची ताकद वाढून मागील निवडणुकीत हा पक्ष प्रमुख विरोधक बनला होता. भाजपची ताकद वाढली, तशी ‘बीजेडी’चीही वाढली होती. २००९ पासून या पक्षाच्या ताब्यात शंभराहून अधिक जागा होत्या. अशी परिस्थिती असताना भाजपने या गडाला खिंडार पाडून बहुमत मिळविले, हे लक्षणीय यश मानले जात आहे.

एक गड पडला

भाजपच्या विरोधात अपवाद वगळता देशभरातील सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले आहेत. ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आंध्र, तमिळनाडू, केरळ अशी काही निवडक मोठी राज्ये वगळली तर भाजपला कोठेही प्रादेशिक पक्षांचे आव्हान उरले नव्हते. या राज्यांतील ओडिशा हे एक राज्य आता भाजपने ‘राष्ट्रीय’ केले आहे. येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘१० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल,’ असे विधान केले होते. हे विधान सत्यात उतरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT