Old Delhi Tram : भारतात वाहतुकीची नवनवी साधने उदयास आली असून आता दळणवळणासाठी वापरण्यात येणारी जुनी साधने दुर्मिळ झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रॅफिकमुक्त रस्त्यांच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. दिल्लीत हल्ली मेट्रो हे दळणवळाचे मुख्य साधन बनले आहे. मात्र काही दशकांपूर्वी भारतात दळवळणासाठी कुठली साधने वापरली जायची याबाबत तुम्हाला माहिती आहे काय? काही दशकांपूर्वी जेव्हा दिल्ली शहरात मेट्रो नव्हती तेव्हा दळणवळणासाठी मुख्य साधन होते ते 'ट्राम'. काही जुन्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये तुम्ही रस्त्यांवर ट्राम असणारे दृष्यदेखील बघितले असतील. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरी यांच्या लग्नाच्या वेळी वऱ्हाडीसुद्धा याच ट्राममध्ये बसून लग्नस्थळी पोहोचले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दिल्ली शहरासाठी वाहतुकीचे मुख्य साधन ट्राम होते. आज आपण दिल्ली शहरात धावणाऱ्या ट्रामबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
जगात सुरुवातीला ट्राम सेवा लंडनमध्ये सुरू झाली होती. १९०१ साली घोड्यांऐवजी वीजेवर चालणारी ट्राम रस्त्यांवर धावू लागली. इंग्रजांनी भारतातील सगळ्या मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीसाठी ट्राम सेवा सुरू केली होती. पुढे मुंबई, कोलकाता, कानपूर आणि नाशिक शहरात ट्राम सेवा सुरू करण्यात आली.
१९०३ मध्ये दिल्ली शहरात वीजपुरवठा सुरू झाला. आणि दिल्लीत विजेवर धावणाऱ्या ट्रामचे आगमन झाले. आज जिथे दिल्ली शहरात चांदणी चौक, चावडी बाजार परिसरात जमिनीखालून मेट्रो तर रस्त्यांवर चकचकीत गाड्या आणि ऑटो दिसतात तिथे एकेकाळी ट्राम असायची.
दिल्ली शहरात वीज येताच, ट्राम आणि रेल्वेमुळे कित्येक एकर जमिनीचे वस्त्यांमध्ये रूपांतर झाले. १९०३ मध्ये सुरू झालेल्या ट्राममुळे १९०७ पर्यंत अजमेरी गेट, पहाड गंज, सदर, भाजी बाजार, जामा मस्जिद परिसरातील रस्ते एकत्र जोडले गेले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लग्नाचं वऱ्हाड सुद्धा याच ट्राममधून लग्नस्थळी पोहोचलं होतं. पंडित नेहरू आणि कमला कौल यांचं लग्न दिल्ली बाजारातील सीताराम भागात झालं होतं. त्यावेळी बरेच वऱ्हाडी याच ट्राममध्ये बसून लग्नस्थळावर पोहोचले होते. त्यावेळचे दिल्लीचे प्रसिद्ध हकीम अजमल खानसुद्धा त्यांच्या बल्लीमरान येथील घरी ट्रामने जात असत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.