old man allegedly tied with bed at madhya pradesh 
देश

...म्हणून रुग्णालयाने वृद्धाला ठेवले बांधून?

वृत्तसंस्था

शाजापूर (मध्य प्रदेश): एका वृद्धाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे बिल भरले नाही म्हणून रुग्णालयाने वृद्धाला बांधून ठेवल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून रुग्णालयावर टीका सुरू केली आहे. पण, रुग्णालयाने हे आरोप फेटाळले आहेत.

लक्ष्मीनारायण (वय 80) हे एका रुग्णालयात उपचार घेत होते. उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांनी सहा हजार रुपये भरले होते. पण, रुग्णालयाचे बील 11 हजार रुपये झाले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी उर्वरीत रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. पण, रुग्णालयाने उर्वरीत रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला सोडणार नसल्याचे सांगितले. शिवाय, त्यांना दोरीने बांधून ठेवले, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. पण, रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. लक्ष्मीनारायण यांना बील भरले नाही म्हणून बांधून ठेवलेले नाही. तर त्यांना झटके येत असल्यामुळे बेडवरून खाली पडू नयेत, म्हणन बांधण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियावर लक्ष्मीनारायण यांचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी रुग्णालयाच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरवात केली. परिसरात रुग्णालय चर्चेत आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

SCROLL FOR NEXT