One Nation One Election: केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली 'वन नेशन, वन इलेक्शन'साठी समिती स्थापन केली आहे. आगामी विशेष अधिवेशनात सरकाय याबाबत विधेयक आणण्याची शक्यता आहे.
दरम्यान 'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली अधिकृत बैठक आज माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होण्याची शक्यता आहे. एनआयने ही माहिती दिली आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काही दिवसांपूर्वी १८ के २२ सप्टेंबरला संसदेचे विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. या पाच दिवसीय अधिवेशनात मोदी सरकार 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक मांडू शकते.
गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारावर भर देत आहेत. कारण असे केल्याने निवडणुका घेण्याचा खर्च कमी होईल आणि वेळेचीही बचत होईल. कोविंद यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचा केंद्राचा निर्णय सरकारचे गांभीर्य दर्शवतो. (Latest Marathi news)
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी मे-जूनमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.