पाटना (बिहार): तुम्ही मला कितीही मारा. तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही. पण, युवतीने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना येथे घडली आहे.
शहरामधील एका युवतीचा विवाह ठरला असून, 2 मार्चला विवाह होणार आहे. पण, सुधीर कुमार नावाचा युवक युवतीच्या घरी गेला आणि आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून गोंधळ घालू लागला. युवतीच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकीत नेले. चौकीत घेऊन गेल्यानंतरही तो गोंधळ घालू लागला.
सुधीर कुमार पोलिसांना म्हणाला, 'आमचे दोघांचे प्रेमसंबंध आहेत. परंतु, प्रेयसीचे कुटुंबियांनी जबरदस्तीने दुसरीकडे विवाह ठरवला आहे. तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही. त्या क्षणी मी तिच्या आयुष्यातून बाजूला जाईल.'
सुधीर कुमारच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी युवतीला चौकीत बोलावले. युवतीने सुधीर कुमार हा त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. पण, चौकीतच त्याने आत्महत्येचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी त्याला समाजावून सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.