सध्या डिजिटल युगामध्ये लहान वयातच मुलांना ऑनलाईन गेम्सचं (Online Games) व्यसन लागलेलं आपल्याला दिसून येत आहे. हे गेम्स खेळण्यासाठी मुलं कोणत्याही पातळीवर जाताना आपल्याला दिसत आहेत. हे गेम्स खोळायला न मिळाल्यामुळे खूप मुलांनी गुन्हे केल्याचे आपल्याला पहायला मिळाले असेल. अशा अनेक घटना दररोज घडत असतात. अशीच एक घटना राजस्थानातील (Rajsthan) नागौर येथे घडली आहे. एका १५ वर्षीय मुलाला फ्री फायर या ऑनलाईन गेम्सचं येवढं व्यसन लागलं की त्याने यासाठी आपल्या चुलतभावाचा खून (Murder) केला आहे. तसेच एकाने आईवडिलांनी मोबाईल न दिल्यामुळे त्यांना खोलीत कोंडून ठेवल्याची घटना घडली होती.
ऑनलाईन गेम्सच्या नादात काही मुलांचा स्मृतीभ्रंश होऊन ते आपल्या परिवाराला ओळखू शकत नाहीत. अशा अनेक घटना रोज घडत असून ऑनलाईन गेम्स कशा प्रकारे लहान मुलांवर परिणाम करत आहेत हे पाहूया...
प्रकरण-१
पबजीची उधारी द्यायची म्हणून केला चुलतभावाचा खून
राजस्थानातील नागौरमधील १६ वर्षाच्या एका मुलाने आपल्याच चुलतभावाचा खून केल्याची घटना घडली असून, आरोपीचा चुलतभाऊ आणि तो असे दोघेही पबजी खेळायचे आणिस त्यांनी त्यांच्यामध्ये चॅलेंज लावले होते. आरोपी गेममध्ये सारखा हारत होता आणि त्यावरील ऊधारी वाढतंच होती. आरोपीकडे द्यायला पैसे नसल्याने त्याने चुलतभावाला गळा दाबून मारले व खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरुन टाकला.
प्रकरण-२
मोबाईलच्या व्यसनाने स्मृतीभ्रंश झाला.
राजस्थानातील चुरु येथील अकरम नावाच्या मुलाला मोबाईलच्या व्यसनाने स्मृतीभ्रंश झाल्याची घटना घडली आहे. तो रात्रंदिवस मोबाईलवर गेम खेळत असायचा, मोबाईलमुळे एका महिन्यापासून त्याने आपले काम सोडले होते. नंतर तो आपल्या परिवारातल्या लोकांना ओळखू शकत नव्हता. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरसुद्धा त्याने मोबाईल सोडला नाही.
प्रकरण-३
आईवडिलांनी खूपवेळा बाहेर काढले पण व्यसनाने त्याला आत्महत्येस भाग पाडले.
जोधपूरमधील प्रतापनगर येथील २१ वर्षाच्या चंद्रप्रकाश ने ऑनलाईन गेम्स च्या नादात आपले जीवन संपवले आहे. त्याला चार महिन्यापासून पबजीचे व्यसन लागले होते. आईवडिलांनी खूपवेळा त्याला यापासून दूर केले पण तो चोरून चोरून खेळायचा. एके दिवशी घरी कोण नसताना त्याने फाशी घेतली.
प्रकरण-४
पहाटे तीन वाजेपर्यंत पबजी खेळून केली आत्महत्या.
राजस्थानातील कोटा येथील नववीत असणाऱ्या १४ वर्षीय किशोर यशवंत या मुलाने ७ जून २०२० मध्ये आत्महत्या केली आहे. हा मुलगा तीन दिवस सलग पबजी खेळताना आढळला आणि तीन दिवसानंतर त्याने फाशी घेतली.
प्रकरण-५
आईवडिलांनी पबजी खेळण्यापासून रोखल्यामुळे घर सोडले.
मोबाईलवर गेम खेळण्यापासून रोखल्यामुळे गुजरातमधील वलसाडच्या एका मुलाने वयाच्या १४ व्या वर्षी घर सोडले. त्याने घरापासून ६८४ किमी प्रवास करुन पालीच्या राणी रेल्वेस्टेशनवर पोहोचला. त्याच्या शाळेचे गुगलवर नाव शोधून स्थानिकांनी त्याच्या मुख्याध्यापकाला फोन करुन कळवले, घर सोडताना त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये मला पबजी खेळून देत नसल्याने मी घर सोडत असल्याचे लिहिले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.