Casteism Even In Death  Esakal
देश

Casteism Even In Death : ‘येथे केवळ ब्राह्मणांवर अंत्यसंस्कार होतील!’

ओडिशातील केंद्रपाडा नगरपरिषद चालवतेय ब्राह्मणांसाठी स्मशानभूमी

सकाळ वृत्तसेवा

केंद्रपाडा (ओडिशा) : ओडिशातील केंद्रपाडा नगरपरिषद केवळ ब्राह्मण समुदायासाठी स्मशानभूमी चालवित असल्याबद्दल टीकेचे लक्ष्य बनली आहे. सुमारे १५५ वर्षांपूर्वीची ही नगरपरिषद राज्याच्या पूर्वेकडील सर्वांत जुनी नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. शहरातील हजारीबगिचा परिसरातील घाटावर नगरपरिषदेने ब्राह्मण स्मशानभूमी नावाने प्रवेशद्वारही उभारले आहे.

त्यामुळे, दलित हक्क कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनी नगरपरिषदेचा निषेध केला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, या स्मशानभूमीत दीर्घकाळापासून ब्राम्हण समुदायातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. सरकारच्या निधीतून नुकताच स्मशानभूमीचा जीर्णोद्धार करण्यात आला.

त्यानंतर, नगरपरिषदेकडून ब्राह्मण स्मशानभूमी नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले. इतर जातींमधील मृतांवर नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीचेही नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. मात्र, ब्राह्मण स्मशानभूमी नावाने प्रवेशद्वार उभारल्याबद्दल व ब्राह्मण समाजातील व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जात असल्याबद्दल दलित हक्क कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी केंद्रपाडा नगरपरिषदेवर टीका केली आहे.

ओडिशा दलित समाजाचे केंद्रपाडा जिल्हाध्यक्ष नागेंद्र जेना म्हणाले, की केवळ ब्राह्मण समुदायासाठीच्या स्मशानभूमीची देखभाल केंद्रपाडा नगरपरिषदेकडून दीर्घकाळापासून केली जात असल्याचे समजल्याने धक्का बसला. यातून ही स्थानिक स्वराज्य संस्था कायदा मोडत असून जातीय भेदभावास प्रोत्साहन देत आहे. हे लवकरात लवकर थांबायला हवे.

माकपचे जिल्हा सचिव गयाधर धाल म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थेने अशा प्रकारे केवळ ब्राह्मणांसाठी स्मशानभूमी चालविणे बेकायदा आहे. इतर जातीतील व्यक्तींनाही या स्मशानभूमीत आपल्या प्रियजंनाना अखेरचा निरोप देण्याचा तेवढाच अधिकार आहे. केवळ ब्राह्मणांसाठीच्या स्मशानभूमीतून घटनेने सर्व जातींना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.’’

स्वर्ग द्वारात सर्व समान

एकीकडे केंद्रपाडा नगरपरिषदेवर भेदभावाचा आरोप होत असताना दुसरीकडे पुरीतील स्वर्गद्वार घाटावर अंत्यसंस्कारात कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्व जातींच्या व्यक्तींवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. जातीजातींमधील भेदभाव नाकारणाऱ्या श्री जगन्नाथांच्या विचारधारेनुसार स्वर्गद्वार घाट सर्वांसाठी उपलब्ध आहे, असे जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक भास्कर मिश्रा यांनी सांगितले.

स्माशनभूमीचा मुद्दा आमच्या निदर्शनास आला असून यात लक्ष घातले जात आहे. जातीय भेदभावाचा आरोप दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील.

- प्रफुल्ल चंद्र बिस्वाल, कार्यकारी अधिकारी, केंद्रपाडा नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT